Categories: राजकीय

‘धनगरांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊ नये’

टीम लय भारी

मुंबई :- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आता चांगलंच तापले आहे. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक संस्थामधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजयकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे (Chhagan Bhujbal has taken an aggressive stance on the issue of OBC reservation).

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी वर्गावर अन्याय झाला आहे. ओबीसींना अन्यायाची अजुनही जाणीव नसल्याने ओबीसी झोपलेल्या अवस्थेतच आहे. ओबीसी आरक्षणावरुन भाजपने राज्यभर रान पेटवण्याचा नियोजित कार्यक्रम 26 जून रोजी आयोजित केला असून 24 जून पर्यंत फक्त ओबीसी आरक्षणावर चर्चा व आंदोलनाचे नियोजन सुरू होते.

उपसचिव, सहसचिव पदोन्नतीमध्ये ‘गडबड गोंधळ’; मंत्रालयात ‘कही खुशी, कही गम’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत असल्याच्या बातम्या येताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची बैठक घेत ओबीसी आंदोलनाच्या बँनरवर मोठ्या शिताफीने मराठा, ओबीसी आंदोलन असा बदल करुन मराठ्यांना भाजपकडे आकर्षित करण्याचा नवा डाव टाकून पंकजाच्या ओबीसी गर्जनेला मराठा आंदोलनाचा फास दिला आहे (The OBC movement has made a new move to attract Marathas to the BJP by making such a change).

भाजपच्या ओबीसी आंदोलनात राज्यभर गर्दी जमवण्यासाठी ओबीसीतील धनगर आणि वंजारी समाजाला तयार करण्यात आले होते. मात्र आज भाजपच्या बैठकीत झालेल्या मराठा, ओबीसी आंदोलनाच्या घोषणेमुळे धनगर समाज पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात जाण्याच्या तयारीला लागला आहे (Due to the announcement of Maratha and OBC agitation in the BJP meeting, the Dhangar community is once again preparing to go against the BJP).

ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारलं

OBC reservation: State to request state poll panel to postpone bypolls

राज्यातील धनगर समाजावर भाजपने सत्तेच्या काळातही अन्याय केला आणि आताही भावनिक करुन वापरून घेण्याच्या तयारीत दिसल्याने धनगर समाज व्यथित झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करतांना म्हटले की, राज्य शासनाने दीड वर्षात ओबीसीची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडली नाही. म्हणूनच चाळीस वर्षाच्या इतिहासात ओबीसी आरक्षणाच्या बाहेर फेकले गेले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपवर टीका करतांना म्हणाले की, इंपिरिअल डाटा मोदी सरकारने दिला नाही. केंद्र सरकार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असुन सत्तेच्या सात वर्षाच्या काळात त्यांनी ओबीसीसाठी काहीही केलेले नाही. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर धनगरांचा एकही प्रश्न नाही मात्र भाजपने तर सत्ता भोगलेली आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना स्वतःच्या आरक्षणाचा विचार एकदा तरी करावा.

भाजपच्या आंदोलनाच्या पोस्टरवर जोपर्यंत धनगर आरक्षण येत नाही तोपर्यंत धनगरांनी भाजपच्या ओबीसी कम मराठा आंदोलनात सहभागी होवू नये अशी विनंती आहे.

-किशोर मासाळ बारामती

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

1 hour ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

3 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

4 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago