29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयउपसचिव, सहसचिव पदोन्नतीमध्ये ‘गडबड गोंधळ’; मंत्रालयात ‘कही खुशी, कही गम’

उपसचिव, सहसचिव पदोन्नतीमध्ये ‘गडबड गोंधळ’; मंत्रालयात ‘कही खुशी, कही गम’

टीम लय भारी

मुंबई :-  मंत्रालयात पंधरवड्यापू्र्वी कक्ष अधिकारी व उपसचिवांच्या मोठ्या प्रमाणात पदोन्नती झाल्या. पण दुसऱ्या बाजूला अवर सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना मात्र पदोन्नतीमध्ये डावलण्यात आले आहे (Mantaralya administration done injustice to Under secretary).

कक्ष अधिकारी असलेल्या तब्बल 67 जणांना अवर सचिव म्हणून पदोन्नती दिली आहे. उपसचिव संवर्गातील 31 जणांना सहसचिव म्हणून पदोन्नती दिली आहे (Mantralaya administration promoted Desk officers and Deputy secretaries).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा

नैसर्गिक वायू निर्मिती कंपन्यांची राज्यात 16 हजार 500 कोटींची गुंतवणुक

याच नैसर्गिक न्यायानुसार अवरसचिव संर्वगातील अधिकाऱ्यांनाही उपसचिव म्हणून पदोन्नती देणे गरजेचे आहे. सुमारे 40 जण या पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत आहेत (Mantralaya administration negative with Under secretaries).

उपसचिव व सहसचिव या संवर्गात असलेल्या काही प्रस्थापित, बलदंड व वशिलेबाज अधिकाऱ्यांनी अवर सचिवांच्या पदोन्नतीमध्ये कोलदांडा घातल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपचे आमदाराने राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर उधळली स्तुतीसुमने

Man arrested in Pune for threatening to blow up Mumbai Mantralaya

तब्बल 40 अवर सचिव पदावरील व्यक्तींना उपसचिव म्हणून पदोन्नती मिळाली तर अगोदरच्या प्रस्थापितांना हवी ती मलईदार पदे मिळविण्यात अडचणी येतील. त्यामुळे स्पर्धक कमी राहावेत, यासाठी या प्रस्थापित अधिकाऱ्यांनी पद्धतशीर खेळी केली आहे.

अवरसचिव पदावरील या 40 जणांवर अन्याय होत आहे. यांतील एकजण 5 दिवसांत निवृत्त होणार आहे. त्यांना हक्काची पदोन्नती मिळाली तर ते उपसचिव तरी होतील. पण ते पद सुद्धा त्यांना मिळवून द्यायचे नाही, असे कारस्थान मंत्रालयातील प्रस्थापित व वशिलेबाज अधिकाऱ्यांनी रचले आहे.

अन्य एक अवरसचिव कॅन्सरग्रस्त आहेत, आणखी पाच जण दिव्यांग आहेत. या 7 जणांसह 40 जणांवर झालेल्या अन्यायामुळे अधिकाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी