राजकीय

तुम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना कमी लेखता का? असा सवाल करत राऊतांनी भाजपावर साधला निशाणा

टीम लय भारी

मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. यावरुन राज्यातील भाजपा नेते टीका करत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करत उत्तर दिलं आहे. यावर मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल असं त्यांनी सांगितलं आहे.( Do you underestimate our health ministers Rawat targeted BJP)

टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांसमवेतच्या या बैठकीत 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असं सांगितलं. मात्र, मला प्रत्यक्षपणे मोदींसमोर बाजू मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही कोविड 19 आणि तिसरी लाट याबाबतचे म्हणणे लेखी स्वरुपात सादर केल्याचेही, टोपेंनी सांगितले. उर्वरित राज्यांनी देखील लेखी  स्वरुपात आपल्या मागण्या आणि राज्यातील कोरोनाचा आढावा केंद्र सरकारकडे पाठवल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

पंतप्रधानांनी कोरोना आढावा बैठकीत बोलण्याची दिली नाही संधी, राजेश टोपे यांनी व्यक्त केली खंत

मंत्री ‘कोरोना’तून बरे झाले, अन् लेकीला झाला आनंद!

Uttar Pradesh Assembly polls 2022: ‘This is just the beginning’, Sanjay Raut taunts BJP over series of resignations in UP

संजय राऊत  टीका करत म्हणाले, मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत. ज्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते. त्यांना कमी का लेखत आहात?,” अशी विचारणा यावेळी संजय राऊतांनी केली. मात्र यावरुन भाजपा टीका करत आहेत यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. भारत-पाकिस्तानवर रोज बोलत आहे, पण आता भारत-चीनवर बोला आणि टीका करा”.

बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत राऊत म्हणाले की, पंतप्रधानांच्या अनुपस्थितीबद्दल मुख्यमंत्री सचिवालय स्पष्टीकरण देईल. चंद्रकांत पाटील आणि इतर भाजपा नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल आणि त्यांना श्रवण यंत्र पण द्यायची आहेत. चंद्रकांत पाटील हे निरागस आहेत निष्पाप आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, एखाद्या वेळी पंतप्रधान सुद्धा एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत. काही वेगळी कामं निघू शकतात. आरोग्यमंत्रीकडे सगळी सूत्रं आहे ते उपस्थित होते. तुम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना कमी लेखता का? असं राऊत म्हणाले.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

4 mins ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago