29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयपंतप्रधानांनी कोरोना आढावा बैठकीत बोलण्याची दिली नाही संधी, राजेश टोपे यांनी व्यक्त...

पंतप्रधानांनी कोरोना आढावा बैठकीत बोलण्याची दिली नाही संधी, राजेश टोपे यांनी व्यक्त केली खंत

टीम लय भारी

मुंबई  :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. देशातील सध्याच्या कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत संवाद साधला. पंतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक होती. त्यापूर्वी या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले.(Tope lamented, PM didn’t give chance speak in Corona meeting)  

माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे, मोदींसमवेतच्या या बैठकीत राजेश टोपेंनी बोलण्याची संधीच मिळाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे बैठकीला हजर राहू शकले नाहीत.एका वेळी दोन ते अडीच तास एका जागेवर बसून राहणे कदाचित त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीकोनातून निश्चित प्रकारे योग्य नसल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. कारण, सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे लेखी पत्र देऊन मी महाराष्ट्राची बाजू मांडली, असे टोपे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मुंबई बँकेची सत्ता प्रवीण दरेकरांच्या हातून निसटली

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ : धनंजय मुंडे

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

No relaxation in curbs till the middle of Feburary, says Maharashtra minister Rajesh Tope

टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांसमवेतच्या या बैठकीत 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असं सांगितलं. मात्र, मला प्रत्यक्षपणे मोदींसमोर बाजू मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही कोविड 19 आणि तिसरी लाट याबाबतचे म्हणणे लेखी स्वरुपात सादर केल्याचेही, टोपेंनी सांगितले. उर्वरित राज्यांनी देखील लेखी  स्वरुपात आपल्या मागण्या आणि राज्यातील कोरोनाचा आढावा केंद्र सरकारकडे पाठवल्या आहेत.

या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी