राजकीय

चक्क कार्यक्रम सुरु असतानाच कार्यकर्ते म्हणाले ‘टरबूज’; एकनाथ खडसे म्हणाले…

टीम लय भारी

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच ठाऊक आहे. भाजपा सोडताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसंच त्यांच्यामुळेच आपण भाजपा सोडत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं (Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis).

दरम्यान एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी मात्र त्यांची जीभ घसरली. जळगावातील मुक्ताईनगरमधील जोंधणखेडा धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात बोलत होते.

Eknath Khadse : एकनाथ खडसे पुन्हा करोना पॉझिटिव्ह?

Eknath Khadse : भाजपात असताना खडसेंनी केले ‘असे’ उद्योग! स्वत:च दिली कबुली

एकनाथ खडसे पत्रकारांशी संवाद साधत असताना तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘टरबूज’ असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यावर एकनाथ खडसेंनी मला माहिती नाही असं म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “पण मला एक माहिती आहे. इंटरनेट ओपन करा, गुगलवर जा आणि टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण? असं टाका. इथून घरी गेल्यानंतर सर्वात आधी हे काम करायचं”.

Eknath Khadse : मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिले : एकनाथ खडसे

ED seeks more time to serve summons to Khadse

गिरीश महाजनांवर साधला निशाणा

एकनाथ खडस यांनी यावेळी जामनेरवाल्याने माझ्या मागे ईडी लावली असं म्हणत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. “जामनेरवाल्याचं ऐकून माझ्या मागे ईडी लावली. नाथाभाऊच्या मागे इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिंबधक विभागाला लावायचं. घरी दोन वेळा इन्कम टॅक्सवाले येऊन गेले.

एकदा तर धाड टाकली होती. मी फार्म हाऊसवर राहत असल्याने तुम्हाला माहिती नाही. लाचलुचपत विभागाने तपास केला असून कोणताही चुकीचा व्यवहार झालेला नाही. न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला असून कोणताही गुन्हा झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

कीर्ती घाग

Recent Posts

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha election) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद…

38 mins ago

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

57 mins ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

1 hour ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

2 hours ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

2 hours ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago