राजकीय

Eknath Shinde : ‘प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो’

महाविकास आघाडीच्या सत्तेला शह देत एकनाथ शिंदेनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि राज्यात नवी सत्ता स्थापन झाली. सत्तेत येऊन महिन्याभरापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशिवाय कोणाचीच वर्णी लागलेली नाही, त्यामुळे मंत्रिमंडळाचा मुद्दा आता चांगलाच वादात सापडल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढू लागल्या आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींकडून अद्याप हिरवा कंदील मिळत नसल्याने ते सुद्धा हताश झाले आहेत. दरम्यान, रविवारी NITI आयोगाच्या महत्त्वपूर्ण सातव्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत हजेरी लावली त्या वेळी बैठकीस उपस्थितीतांचा फोटो काढण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रांगेत शेवटचे स्थान दिल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आले. या फोटोवर राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी चांगलीच टीका केली आहे. मिटकरी ट्विटमध्ये लिहितात, “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा” हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो .शिंदे साहेब वाईट वाटले, असे म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दिल्लीदरबारी शेवटचे स्थान मिळाल्याने दुःख व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

Manisha Kayande : भंडारा बलात्कार पीडितेची आमदार मनिषा कायंदे यांनी घेतली भेट

Breaking : हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

दरम्यान राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. सोशल मीडियावर ट्विटमध्ये रोहित पवार लिहितात, एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! असे म्हणून त्यांनी महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदाला दिलेल्या वागणूकीबद्दल पवार तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. हा दौरा महत्त्वाचा असून यामध्ये अमृतमहोत्सवानिमित्त बैठक आणि निती आयोगाची सुद्धा बैठक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. या दरम्यान शासकीय बैठकीतील व्हायरल झालेला फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago