राजकीय

खळबळजनक ! राजकीय क्षेत्रात खळबळ, 100 ठिकाणी इनकम टॅक्सच्या धाडी

देशामध्ये इनकमटॅक्सच्या धाडीने एकच खळबळ माजली आहे. देशातील विविध राज्यात 100 ठिकाणी इनकम टॅक्सने धाडी टाकल्या आहेत. यामध्येअनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या धाडीमध्ये सुरूवातीला छोटया नेत्यांची नावे समोर आली असली तरी देखील काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.राजकीय फंड, टॅक्स न भरणे तसेच दारु घोटाळया सारखी अनेक प्रकरणे या धाडीमध्ये उघड होणार आहेत. या धाडीमध्ये विविध पक्षांतील मोठया नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तसगढ, उत्तराखंडासह 7 राज्यांत इनकम टॅक्सने धाडी टाकल्या आहेत. जयपूरजवळ कोटपूतली येथे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांची पाटर्नर शीप असलेल्या एका कंपनीवर धाड टाकण्यात आली आहे.

राजेंद्र यादव आणि त्यांच्या नातेवाईक मिळून एकूण 53 ठिकाणी या धाडी पडल्या.सकाळी 5 वाजता मिड डे मीलवर इनकम टॅक्सने धाड टाकली. तसेच महाराष्ट्रातील काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. याविषयी संपूर्ण माहिती पुढे आलेली नाही. छत्तीगडमधील रायगडमध्ये स्टील आणि दारु घोटाळया प्रकरणी अनेक ठिकाणी इनकम टॅक्सने छापेमारी केली आहे. छत्तीसगडमध्ये अमोलक सिंह या व्यक्तीचे नाव पुढे आले आहे. तसेच रामदास अग्रवाल, अनिल अग्रवाल, ऐश्वर्या किंगडम, आर के गुप्ता यांच्या घरावर इनकम टॅक्सने छापेमारी केली आहे

हे प्रकरण दारु घोटाळा आणि टॅक्स न भरण्या संबंधी आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 24 शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक राजकीय नेते निशाणावर आहेत. तसेच लखनऊच्या छितवापुरमध्ये हिसी आयटीवर देखील इनकम टॅक्सने धाड टाकली आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय क्रांत‍िकारी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष गोपाल राय यांच्या कार्यालयावर इनकम टॅक्सने छापेमारी केली.हे प्रकरण राजकीय फंडाशी निगडीत आहे.

हे सुद्या वाचा

Radhika Apte : ‘या’ लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस

Rishi Sunak : ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सुनक हरले

Car : भयंकर ! दररोज 41 जण सीट बेल्ट न लावल्यामुळे आपला जीव गमावतात

बेंगलूरमध्ये टॅक्स न भरल्याच्या कारणांवरुन सुमारे 20 ठिकाणी इनकम टॅक्सने धाडी टाकल्या. या ठिकाणी मनीपाल ग्रुपवर कारवाई करण्यात आली. तर सीबीआयने ममता बॅनर्जींचे कायदे मंत्री मलय घटक यांच्याशी संबंधीत 6 ठिकाणी छापेमारी केली. यांच्याघरी सीबीआयची टीम सकाळी 8 वाजता पोहोचली. तसेच कोलकातमध्ये आणखी 5 ठिकाणी इनकम टॅक्सने धाडी टाकल्या आहेत.

रूपाली केळस्कर

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago