32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
HomeजागतिकRishi Sunak : ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सुनक हरले

Rishi Sunak : ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सुनक हरले

ब्रिटीश पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये असेलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे निवडणुकीत हरले आहेत. त्यांच्या जागेवर लिस ट्रस या पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक हे केवळ 21 हजार मतांनी हरले.

ब्रिटीश पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये असेलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे निवडणुकीत हरले आहेत. त्यांच्या जागेवर लिस ट्रस या पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक हे केवळ 21 हजार मतांनी हरले. लिस ट्रस या ब्रिटनच्या त‍िसऱ्या महिला पंतप्रधान होणार आहेत. लिस ट्रस या 81,329 मतांनी जिंकल्या. तर ऋषी सुनक यांना 60, 399 मतं मिळाली. त्यामुळे ऋषी सुनक हे केवळ 20,927 मतांनी हरले. लिस ट्रस यांच्या आगोदर मार्गारेट थॅचर‍ आणि थेरेसा यांनी हे पद भूषवले आहे. बोर‍िस जॉन्सन यांनी 7 जुलैला ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. जॉन्सन हे अनेक काळ वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर जॉन्सन यांच्या कॅबिनेट मंत्रीनी राजीनामा दिला. ऋषी सुनक हे 42 वर्षांचे आहेत.

कोण आहेत ऋषी सुनक :
ऋषी सुनक हे एक ब्रिटिश नेते आहेत. इन्फिोस‍िसचे सह संस्थापक असलेल्या नाराण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी 13 फेब्रुवारी 2020 रोजी ब्रिटनच्या आर्थमंत्री पदाचा कारभार स्विकारला होता. ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साऊथ हेंपट येथे हिंदू पंजाबी पर‍िवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव यशवीर सुनक आणि आईचे नाव उषा सुनक होते. यश सुनक यांचा जन्म केन‍िया येथे झाला. तर आई उषा सुनक यांचा जन्म टांझानिया येथे झाला. ऋषी सुनक यांच्या आजी आजोबांचा जन्म भारतात झाला. ते 1960 मध्ये आपल्या मुलांना घेऊन ब्रिटनमध्ये आले.

हे सुद्या वाचा

Ganeshotsav 2022 : अजित पवारांनी घेतले सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन

Navneet Rana : तु ठाकरे है, तो मै राणा हूँ !

Eknath Shinde : जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदेना पत्र

ऋषी सुनक यांचे वडील यशवीर सुनक हे चिकित्सक होते. तर आई उषा सुनक फार्मासिस्ट होत्या. ऋषी सुनक यांनी विंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑक्सफर्ड युन‍िर्व्हरसीटीमध्ये अर्थशास्त्र आणि राजकारणाची पदवी घेतली. 2009 मध्ये त्यांनी बंगलोरमध्ये लग्न केले. भारतीय अरब पती नाराण मूर्ती यांची मुलगी त्यांची पत्नी आहे. अक्षता मूर्ती या ब्रिटन मधल्या सगळयात श्रीमंत महिलांपैकी एक महिला आहेत. ऋषी सुनक यांनी 2001 मध्ये कॅलिफोर्निया येथील एका आर्थिक बँकेमध्ये पहिली नोकरी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी