29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनRadhika Apte : 'या' लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस

Radhika Apte : ‘या’ लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस

राध‍िका आपटे हे चित्रपटाच्या दुनियेतले एक नावाजलेले नाव आहे. एक बिनधास्त अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिचा जन्म 7 सप्टेंबर 1985 मध्ये झाला. आज तिचा वाढदिवस आहे. राधिकाचा जन्म तामिळनाडुमधील वेल्लोर येथे झाला.

राध‍िका आपटे हे चित्रपटाच्या दुनियेतले एक नावाजलेले नाव आहे. एक बिनधास्त अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिचा जन्म 7 सप्टेंबर 1985 मध्ये झाला. आज तिचा वाढदिवस आहे. राधिकाचा जन्म तामिळनाडुमधील वेल्लोर येथे झाला. तिच्या पतीचे नाव बेनेडिक्ट टेलर आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने अर्थशास्त्र आणि गण‍िताची पदवी घेतली. राधिका आपटेंनी स्पर्धात्मक जगात आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. राधिका आपटे ही एक बिनधास्त अभिनेत्री आहे. ती कॅमेऱ्यापुढे अजिबात लाजत नाही. तीचा अभिनय उत्तमआहे. तिची ओळख बोल्ड अभिनेत्री अशी आहे.

पुण्यामध्ये असतांना तिने रोहिणी भाटे यांच्याकडून कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने पुण्यात नाटकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुंबईमध्ये येऊन तिने चित्रपटांत काम सुरू केले. सुरूवातीला नाटकांत तिने 8-10 हजार पगारावर काम केले. ‘घो मला असला हवा’ या नावाच्या पहिल्या मराठी चित्रपटा पासुन तिने आपल्या चित्रपटात काम सुरू केले.तर ‘शोर’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट आहे.

राध‍िका लंडनच्या ट्रिनिटी लॅबन कन्सर्वाटॉर ऑफ म्युझिक अँड डान्समध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले. तिथे तिची ओळख बेनेडिक्ट यांच्या बरोबर झाली. त्यांनी लग्न केले. राधिकाने बंगाली नाटकात 2009 मध्ये एक भूमीका केली होती. ती चांगलीच गाजली. बदलापूर, हंटर, मांझी-द माउंटन मॅन हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. तसेच तिचे फोब‍िया पार्च्डमधील भूमीका देखील गाजल्या. राध‍िकाचे तीन नेटफ‍िक्समध्ये भूमिका साकारली होती. लस्ट स्टोरील, एंथॉलॉज, फ‍िल्म, सेक्रेड गेम्स आणि मिनी मालिका घोल यातील भूमीकांसाठी तिला अंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

हे सुद्या वाचा

Rishi Sunak : ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सुनक हरले

Car : भयंकर ! दररोज 41 जण सीट बेल्ट न लावल्यामुळे आपला जीव गमावतात

Maharashtra Politics : ‘भाजपचे नेते 100 टक्के खोटे बोलतात, मग अमित शाह 50 टक्केच खोटे का बोलले बरे…’

राधिका आपटेचे चित्रपट
वाह! लाईफ हो तो ऐसी हिंदी), अंतहीन ब्रिन्दा बंगाली), समांतर रेवा (मराठी), घो मला असला हवा (मराठी), द वेटिंग रुम (हिंदी), रक्त चरित्र ( तेलगू) , नंद‍िनी, (तेलगू), आयएम नताशा हिंदी, शोर इन थे सिटी (हिंदी), धोनी, (तामिळ), (तेलगु), हा भारत माझा (मराठी), तुकाराम आवली (मराठी), रुपकथा नोय सानंदार (बंगाली) , ऑल इन ऑल अल्यागु राजा मीनाक्षी (तामिळ), पेन्डूलम नंदिता (बंगाली), लिजण्ड (तेलगु), पोस्टकार्ड (मराठी), वेत्री सेल्वन (तामिळ), लई भार (मराठी), बदलापूर (हिंदी), राम (मल्याळम), हंटर( हिंदी), लायन (तेलगू), मांझी (हिंदी), कौन कितने पाणी मे (हिंदी), द ब्राईट डे (हिंदी) , इज प्रेझेन्टरिजा (हिंदी) फोबया (हिंदी) कबाली (तामिळ) मॅडली (हिंदी) पॅड मन( हिंदी) लस्ट स्टोरील( हिंदी) अंधाधुन सोफी (हिंदी) बाझार (हिंदी), बोम्बिरीया मेघना (हिंदी) चिथिराम पेसुथडी (तामिळ) द वेडिंग गेस्ट समीरा (इंग्रजी) द आश्रम गायत्री (इंग्रजी) कॉल टू स्पाय नूर इनायत खान (इंग्रजी) रात अकेली है राधा (हिंदी ) चित्रपटात काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी