राजकीय

EXCLUSIVE : एकनाथ शिंदेंची भूक वाढली, भाजपकडे केली मुख्यमंत्रीपदाची मागणी

टीम लय भारी

मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल. त्यात एकनाथ शिंदेंकडे उपमुख्यमंत्रीपद असेल अशी चर्चा आतापर्यंत होती. पण शिंदे यांची भूक वाढली आहे.
एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचीच मागणी केली आहे. स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद व मुलगा श्रीकांत याच्यासाठी केंद्रात मंत्रीपद देण्याची मागणी शिंदे यांनी थेट अमित शाह यांच्याकडे केली असल्याची माहिती नवी दिल्लीतील सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. शिवसेना मला मुख्यमंत्री बनवायला तयार आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडी सरकार’मध्ये राहून सुद्धा मी मुख्यमंत्री होऊ शकतो. मी भाजपसोबत यावे वाटत असेल तर मला मुख्यमंत्रीपद द्या, असे म्हणणे एकनाथ शिंदे यांचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

माझ्यासोबत शिवसेनेतून फुटलेले व अपक्ष असे मोठ्या संख्येने आमदार आहेत. भाजप व माझा गट अशा एकूण आमदारांची संख्या 158 ते 160 होऊ शकेल, असा निरोप शाह यांनी अमित शाह यांच्यापर्यंत पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
देवेंद्र फडणवीस मोठे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणारा भाजपातही एक मोठा गट आहे. या गटालाही एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद गेले तरी चालेल, असे वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

2 hours ago

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…

3 hours ago

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

4 hours ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

6 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

6 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

6 hours ago