राजकीय

AUDIO CLIP : अबब ! फुटलेल्या आमदाराला 50 कोटीची ऑफर, ऑडीओ क्लिप व्हायरल

टीम लय भारी

मुंबई : बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्व, उद्धव ठाकरे भेटत नाहीत, आमची कामे होत नाहीत, अशी कारणे देत एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला आहे. प्रत्यक्षात ही कारणे खोटी आहेत. या आमदारांना मोठे घबाड मिळाल्यानेच ते बाहेर पडल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे,
एका आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे फुटीर आमदारांना मोठे घबाड मिळल्याचे दिसत आहे.
‘आपल्याला ५० कोटी रुपये देत होते. पण पैशाला काय करायचे आहे. जीवन महत्वाचे. माझी सुखी राहण्याची इच्छा आहे’, असे हा आमदार कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हा आवाज कोणत्या आमदाराचा आहे, याची चौकशी केली असता, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा हा आवाज असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गुवाहाटीवरून एकनाथ शिंदे यांना गुंगारा देवून नितीन देशमुख महाराष्ट्रात परत आले. त्यांनी शिवसेनेसोबतच राहण्याचा स्वाभिमानी निर्णय घेतला. त्याबद्दल प्रितम नावाच्या एका व्यक्तीने देशमुख यांना फोन केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
या व्यक्तीने देशमुख यांचे कौतुक व अभिनंदन केले. त्यावेळी आपल्याला 50 कोटी रूपये देत होते. पण पैशाला काय करायचंय असे हे आमदार म्हणजेच देशमुख बोलत असल्याचे दिसत आहे.
नितीन देशमुख यांना 50 कोटी रुपये ज्या लोकांनी देऊ केले, त्यांनी इतर फुटीर आमदारांसाठी सुद्धा हा आकडा ऑफर केलेला असू शकतो, असे चर्चेला आता उधाण आले आहे.
त्यामुळे बाळासाहेब ठाकरे व हिंदुत्वाप्रती निष्ठा सांगणारे ढोंगबाजी करीत असल्याचेही यातून दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : EXCLUSIVE : एकनाथ शिंदेंची भूक वाढली, भाजपकडे केली मुख्यमंत्रीपदाची मागणी

महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यास तयार ; अजित पवारांनी सरकारी गाडी सोडली

उध्दव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट,एकनाथ शिंदेंना शिव्यांचा भडीमार !

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

8 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

8 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

10 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

12 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

12 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

12 hours ago