राजकीय

‘सरकारकडून बेरोजगारांना सबुरीचे गाजर’ वडेट्टीवारांचा सरकारवर संताप

राज्यात परीक्षा होऊन काही दिवस झाले आहेत. मात्र अजूनही निकालाचा तपास नाही. रात्रीचा दिवस करणारे अभ्यासू मुलं निकाल कधी लागणार ही आशा घेऊन जगत आहेत. भरतीच्या परीक्षा जुलै ते सप्टेंबर महिन्यात झाल्या आहेत. मात्र नोव्हेंबर संपत आला तरीही परीक्षेचा निकाल लागला नाही. परीक्षा देऊन लाखोंच्या संख्येने विद्यार्थी निकालाची वाट पाहत संतापले आहेत. आता निकाल कधी लागणार याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. अशातच आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

तलाठी पदासाठी ११ लाख अर्ज आले होते. तर दुसरीकडे वनविभागासाठी साडे पाच लाख अर्ज आले आहेत. असे इतरही सहा विभागांमध्ये अर्ज आले होते. यामध्ये आता एकूण २५ लाख उमेद्वारांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये nतलाठी nपशुसंवर्धन nवनविभाग अर्थ संख्यांकी आणि कृषीविभागाच्या परीक्षा झाल्या आहेत मात्र अजूनही निकाल लागला नाही. यावर विजय वडेट्टीवारांनी सरकारला सुनावले आहे.

हे ही वाचा

‘खेळाडू राजकीय नेत्यांहून अधिक शिस्तप्रिय’

‘जय श्री राम, ‘भारत माता की जय’ घोषणा देऊन काय होणार’? भाजप खासदाराचा भाजपला सवाल

शरद पवार आणि अजित पवार येणार एकत्र? निलेश लंकेंचं स्पष्टीकरण

काय म्हणाले वडेट्टीवार

तलाठी पद भरती परीक्षा पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा वन विभागातील पद भरती परीक्षा अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा कृषी विभागातील पद भरती परीक्षा अशा पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल हे काही महिन्यांपासून रखडले आहेत. ज्यामुळे २५ लाख उमेद्वार निकालासाठी प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदांची भरती पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यातील तरुणांना दिले होते. भरती पूर्ण करणे तर सोडा सरकारने अजून परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाही.

सरकारच्या इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले सबुरीचे गाजर आहे, असे वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

4 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

8 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago