28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'खेळाडू राजकीय नेत्यांहून अधिक शिस्तप्रिय'

‘खेळाडू राजकीय नेत्यांहून अधिक शिस्तप्रिय’

देशात आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप (ICC World Cup 2023) होऊन एक-दोन दिवस झाले असतील. या सामन्यात टिम इंडियाने चांगली कामगिरी करत १० सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे. मात्र शेवटच्या सामन्यात इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी होते. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला अश्रू आनावर झाले नाहीत. मोहम्मद सिराजलाही रडू आवरत नव्हते. के.एल. राहुलने मान खाली घालत वर काढली नाही. यावेळी टिम इंडिया संघाला पराभव पचवता आला नाही. यावेळी पंंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खेळाडूंची भेट घेतली. यावर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. (kirti Azad)

आयसीसी वर्ल्डकपचा अंतिम सामना संपल्यानंतर नरेंद्र मोदी खेळाडूंना भेटायला गेले. यावेळी मोदींनी सर्वांची भेट घेतली. सोशल मीडियाद्वारे भेटीचे काही फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या हातात हात घालून काही फोटो व्हयरल होत आहेत. यावेळी टिम इंडियाचा गोलंदाज शमीला कवटाळून घेतले आहे. त्यानंतर जडेजा, शुभमन गिल, श्रेयश अय्यरसोबत हस्तांदोलन केले. यावर श्रेयश अय्यरच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता देशभर चर्चा आहे. त्यानंतर मोदींनी टिम इंडिया कोच राहुल द्रविडची भेट घेतली. या भेटीवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

काय म्हणाले किर्ती आझाद?

टिम इंडियाचे १९८३ सालचा वर्ल्डकप विजेते संघातील माजी खेळाडू किर्ती आझाद यांनी नरेंद्र मोदींच्या भेटीवर वक्तव्य केले आहे. खेळाडूंच्या ड्रेसिंगरूममध्ये कोणत्याही व्यक्तीला येण्याची परवानगी नसते. एखाद्या गाभाऱ्याप्रमाणे खेळाडूची ड्रेसिंगरूम आहे. आयसीसी आणि स्टाफ व्यतिरीक्त कोणालाही या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी नसते. मोदींनी बाहेरील कक्षात खेळाडूंची भेट घेणं आपेक्षित होते. एक राजकारणी नाही पण खेळाडू म्हणून सांगत आहे, असे किर्ती आझाद म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी हे त्यांच्या बेडरूममध्ये, ड्रेसिंगरूममध्ये सांत्वनासाठी, भेटण्यासाठी परवानगी देतील का? राजकीय नेत्यांपेक्षा खेळाडू शिस्तप्रिय असतात, असे किर्ती आझाद यांनी पोस्टमध्ये आपले मत व्यक्त केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी