28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'जय श्री राम, 'भारत माता की जय' घोषणा देऊन काय होणार'? भाजप...

‘जय श्री राम, ‘भारत माता की जय’ घोषणा देऊन काय होणार’? भाजप खासदाराचा भाजपला सवाल

देशात आगामी निवडणुकांचे वारे आत्तापासून वाहू लागले आहे. आगामी निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असावा मात्र भाजप निवडणुकांपूर्वी जय्यत तयारी करताना दिसत आहे. राज्यातील विधानसभेच्या प्रचारासाठी जात असून राम मंदिराचे दर्शन सरकार देईल मात्र भाजपचे सरकार राज्यात निवडूण आणा, असे ज्या त्या राज्यातील मतदारांना भाजप आवाहन करत आहे. यावरच भाजपचे खासदार वरुण गांधींनी भाजपला (BJP) फटकारले आहे. जय श्री राम, भारत माता की जय घोषणा देऊन काय होणार आहे? असा सवाल आता भाजप खासदार वरुण गांधींनी (varun Gandhi) केला आहे. यामुळे वरुण गांधींना आगामी निवडणुकीत संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होतो.

भाजप खासदार वरुण गांधी हे भाजपविरोधात अनेक वक्तव्य करत असून भाजप आता वरुण गांधींना आगामी खासदारकीच्या निवडणुकीत तिकिट देणार का? अशी चर्चा सुरू आहे. भाजपचा खासदार आपल्याच पक्षावर दावा आणि आरोप करत असल्याचे पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. मोदी सरकरला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारताना दिसत आहेत. भाजपच्या घोषणा, सरकारी नोकरी, योजना यांवर आता वरुण गांधींनी प्रश्न विचारले आहे. कदाचित ते अपक्ष राहण्याची चिन्हे आहेत ते वेगळी चुल मांडण्याची भूमिका घेऊ शकतात. त्यांनी भाजपवर केलेल्या प्रश्नांवर आणि टीकेवरून असे वाटत आहे.

हे ही वाचा

शरद पवार आणि अजित पवार येणार एकत्र? निलेश लंकेंचं स्पष्टीकरण

कपिल देवसह आणखी एका दिग्गज व्यक्तीला फायनलचं आमंत्रण नाही

‘पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी’

काय म्हणाले वरुण गांधी?

मा भारत मातेला माता मानतो, मी भगवान रामालाही मी देव मानतो. जय हनुमान देवाचा मी भक्त आहे. जय श्री राम, भारत माता की जय बोलून काय होणार आहे. ज्या लोकांनी कर्ज काढलं आहे. त्यांचं कर्ज फेडता येणं गरजेचं आहे. जर त्यांना कर्ज फेडता आलं नाही तर त्यांची संपत्ती जप्त केली जाते. त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल. या सगळ्यांचा उपाय हा जय श्री राम, भारत माता की जय या घोषणेत नाही. अनेक समस्या उपस्थित होत आहे. तरूणांना नोकऱ्या नाही उत्पन्न नाही, या समस्या कशा सुटणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सामान्य माणसाने कसे जगायचे?

उज्जवला योजनेच्या माध्यमातून सात कोटी सिलिंडर्स देण्यात आले आहेत. सध्या दुसरा सिलिंडर घ्यायची सामान्यांची कुवत नाही. कारण सिलिंडरचा दर हा ११०० रूपये झाला असल्याने सामान्य माणसाने कसे जगायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी