राजकीय

जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी तलवार उपसली आहे. शरद पवार हे जरांगे-पाटील यांचे राजकीय बॉस असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला. जरांगे-पाटील यांची आज अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी महाविराट सभा झाली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर टीकेची झोड उठवली आहे. या सभेत जरांगेचे बोलणे मग्रुरीचे, मुजोरीचे होते. त्यांची भाषा शिवराळ होती, असा आरोप करत या सभेच्या निमित्ताने जरांगेच्या अकलेची कुवत उघडी पडली असून यात वैचारिक असे काहीही घडले नाही, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला. एवढेच नाही तर जरांगेंची सभा विराट वगैरे नव्हती तर एखाद्या यात्रे एवढीही गर्दी नव्हती, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

मुळात जातींवर आधारित सभांना मी समर्थन देत नाही. जरांगेची सभा एखाद्या यात्रेसारखी होती. लोक यात्रेत मौजमजेसाठी येतात, या शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे-पाटील यांची खिल्ली उडवली. त्याचवेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप करून शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी जरांगेना कोणत्या स्वरुपात पाठिंबा दिला, हे जाहीर करावे, असे आव्हान दिले. आणि शरद पवार हे जरांगे यांचे पॉलिटिकल बॉस असल्याचाही आरोप केला.

दरम्यान, एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्यातील आहे, मराठा जातीची नाही, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावून सांगितले. खरे तर मराठा समाज मागास नाही. या समाजाला सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारले आहे आणि आरक्षण हे मागणीवर नसते तर परिस्थितीवर असते, असे सांगतानाच जरांगे स्वत:ला पाटील समजतात आणि कुणबीतून आरक्षण मागतात, याकडेही लक्ष वेधून जरांगेंचं काहीच आकलन नाही, अशी टीका केली.

हे ही वाचा

मराठ्यांना अंगावर घेऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा

‘अजित पवारांनी भुजबळांना समज द्यावी नाहीतर..’ जरांगे पाटलांचा इशारा

जरांगेंचे फेसबुक पेज कोणी केले बंद?

जरांगे-पाटील यांनी त्यांच्या भाषणात गुणरत्न सदावर्ते आणि भुजबळ यांना समज द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली. ते मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर पलटवार केला. मला अटक करण्याची मागणी होत आहे. पण मला अटक करणे सोपे आहे का, असे विचारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुणवर्त सदावर्तेंना समज द्यावी, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले होते. जरांगे पाटील यांनी  गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केल्यानंतर लगेचच सदावर्ते यांनी जरांगे-पाटील यांच्यावर कठोर टीका केली.

 

 

 

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

6 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago