राजकीय

इंडियाच्या बैठकीतून शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देश पातळीवर नेण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकारविरोधात देशातील २८ पक्ष एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीच्या ३१ ॲागस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मोदी सरकार विरोधात लढण्यासाठी काय काय रणनीती आखता येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच मुंबईत १ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘जननायक राहुल गांधी’ यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, मोदी यांच्या विरोधात जनमत तयार करण्यात राहुल गांधी यशस्वी होत असून आगामी लोकसभा निवडणुकीत राज्य स्तरावर त्या त्या पक्षांना जागा वाटपांचे अधिकार द्यायचे की कसे, निवडणुकीत केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणावर टीका करायची याबाबत विचार विनिमय होणार आहे. या बैठकीचे यजमान पद शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देश पातळीवर बिंबवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होणार आहे.

देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच राहुल गांधी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. दादर येथील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात राहुल गांधी यांच्या सत्काराच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नाना पटोले प्रसार माध्यमांशी संवाद पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची खासदारकी रद्द केली, त्यानंतर त्यांना सरकारी घरही खाली करावयास भाग पाडले पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोदी सरकारला राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली. मोदी सरकारवरील अविश्वासदर्शक ठरावात भाग घेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर तुफान हल्ला केला. मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर तोफ डागली.

देशातील हुकुमशाही कारभाराला सडेतोड उत्तर देणाऱ्या राहुल गांधी या काँग्रेसच्या निडर योद्ध्याचा सत्कार १ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे आज मुंबईत आगमन झाले. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, शिवसेना आ. सचिन अहिर यांनी त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले.

महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे. मोदी सरकारचा पराभव करणे हाच मविआचा उद्देश असून ही आघाडी त्यावर भर देत आहे, असे नाना पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपाकडून होत असलेली टीका हास्यास्पद आहे. देशभरातील २८ पक्ष मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत, बंगलुरुमध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली. इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी व भाजपा घाबरलेले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात ६२ टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही असे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी बीआरएससारख्या पक्षांना पुढे केले जात आहे.

हे सुद्धा वाचा
रक्षाबंधन सणानिमित्त व्यापाऱ्यांकडून ‘केक’चे लाल गाजर !
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची रक्षाबंधन ठरणार आगळी -वेगळी!
‘या’ राजकीय नेत्याने आपल्या दत्तक लेकरांविषयी व्यक्त केल्या भावना, तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल !

निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. सरकारधील वादाचा फटका शेतकरी, तरुण, कामगार, व राज्यातील गुंतवणूकीवर होत आहे. महाराष्ट्रात अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याने कोणताही मोठा गुंतवणुकदार येत नाही. वेदांता फॉक्सनसारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला. आताही ऍपल कंपनीने ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तामिळनाडू, कर्नाटक राज्यात केली आहे. यामुळे राज्यातील तरुण रोजगारांपासून वंचित राहत आहेत. कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जपान, चीन मध्ये कांदा २००-३०० रुपये किलो आहे, कांदा निर्यात केला तर शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील म्हणून केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, मोदी यांच्या विरोधात जनमत तयार करण्यात राहुल गांधी यशस्वी होत असून आगामी लोकसभा निवडणुकीत राज्य स्तरावर त्या त्या पक्षांना जागा वाटपंचे अधिकार द्यायचे की कसे, निवडणुकीत केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणावर टीका करायची याबाबत विचार विनिमय होणार आहे. या बैठकीचे यजमान पद शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देश पातळीवर बिंबवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होणार आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

4 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

8 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago