राजकीय

Kartik Kumar : फरार असणारा कार्तिक कुमार निवडणूक प्रचारात व्यस्त? फोटो व्हायरल

बिहारचे माजी कायदा मंत्री कार्तिक कुमार यांना शोधण्यात पोलिस असमर्थ आहेत पण ते अनंत सिंग यांच्या पत्नी नीलम देवी यांच्या प्रचारात मोकामामध्ये व्यस्त आहेत. दसऱ्याच्या दिवशी असे फोटो समोर आले आहे. कार्तिक कुमार निवडणुकीचा प्रचार करत असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोबाबत असे सांगितले जात आहे की, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर नीलम देवी जेव्हा मोकामा भागात पोहोचल्या तेव्हा त्या मोकामा मार्केटमधील लोकांना भेटायला गेल्या. यावेळी नीलम देवी यांच्यासोबत माजी कायदा मंत्री कार्तिक कुमार देखील दिसला जो फरार आहे. या फोटोत अनेक कामगारही दिसत आहेत जे नीलम देवींना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत.

कार्तिक सिंग यांनी दिले स्पष्टीकरण
सर्वत्र ही बातमी पसरताच कार्तिक सिंहने आपले स्पष्टीकरण दिले. कार्तिकने वृत्तवाहिन्यांना सांगितले की ते नियमितपणे भेटत राहतात. हे जुने फोटो आहे. येथे, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कार्तिक सिंग जेव्हा वृत्तवाहिन्यांशी बोलू शकतो, तर पोलीस त्याला का शोधू शकत नाहीत?

हे सुद्धा वाचा

Rashmika Mandhana Vijay Devarkonda : रश्मिका अन् विजय करतायत डेट! एकत्र साजरा केलेल्या वेकेशनचे व्हिडिओ व्हायरल

Organic Farming : ‘बटाट्याचे गाव!’ माण तालुक्यातील छोट्याशा गावात सेंद्रिय बटाट्याचे विक्रमी उत्पादन

T20 World Cup : न्यूझीलंड संघाच टेन्शन वाढलं! दिग्गज अष्टपैलू दुखापतीमुळे संघातून बाहेर

राजू सिंग अपहरण प्रकरणात फरार आहे
बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एमएलसी कार्तिक सिंह यांना कायदा मंत्री करण्यात आले होते. कायदामंत्री होताच बिल्डर राजू सिंग यांच्यावर बिहटा पोलिस ठाण्यात नोंद झालेला जुना गुन्हा चव्हाट्यावर आला. या प्रकरणाने पेट घेतला आणि शेवटी कार्तिक सिंगला राजीनामा द्यावा लागला. त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. दानापूर न्यायालयात सतत तारखा सापडत आहेत. याप्रकरणी आता 12 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

काय प्रकरण आहे?
हे संपूर्ण प्रकरण 2014 चे आहे. राजीव रंजन उर्फ ​​राजू सिंग यांचे बिहटा येथे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी बिहाटा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कार्तिक सिंगवर वॉरंट होते. ते 16 ऑगस्टला न्यायालयात शरण येणार होते, मात्र ते 16 ऑगस्टला मंत्री म्हणून शपथ घेत होते.

प्रणव ढमाले

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

57 mins ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago