29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रOrganic Farming : 'बटाट्याचे गाव!' माण तालुक्यातील छोट्याशा गावात सेंद्रिय बटाट्याचे विक्रमी...

Organic Farming : ‘बटाट्याचे गाव!’ माण तालुक्यातील छोट्याशा गावात सेंद्रिय बटाट्याचे विक्रमी उत्पादन

सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठेत मिळणारी मागणी लक्षात घेऊन तरूण शेतकऱ्यांनी 'बोथे माणदेश ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी'ची स्थापना केली . यातून यंदा 29 एकरांवर तब्बल दहा हजार क्विंटल सेंद्रिय बटाट्याचे उत्पादन केले आहे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. आजही भारतभरात शेतीच्या क्षेत्रात अनेक नवनविन प्रयोग होत असतात. अनेकदा काही शेतकरी क्रांती घडवणार प्रयोग आमलात आणत असतात. ज्यामुळे युवा शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असते. यावेळी असाच एक धाडसी मात्र यशस्वी प्रयोग झाला आहे महाराष्ट्रातील माण तालुक्यात असणाऱ्या बोथे गावात. माण तालुक्यातील छोट्याशा बोथे गावाने गेल्या अनेक वर्षांपासून बटाटा उत्पादनात लौकिक मिळवला आहे. सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठेत मिळणारी मागणी लक्षात घेऊन तरूण शेतकरी एकत्रित येऊन ‘बोथे माणदेश ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली . या माध्यमातून यंदा 29 एकरांवर तब्बल दहा हजार क्विंटल सेंद्रिय बटाट्याचे उत्पादन घेऊन बटाटा क्रांती घडवून आणली आहे.

बोथे गावाची लेकसंख्या जेमतेम 1000च्या आसपास, गावात गेल्या 50 वर्षांपासून बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. माणदेश ऍग्रो प्रोड्युसर कंपनी च्या अधिकारी कर्मचारी यांनी बटाट्याचे अभ्यासपूर्ण, नाविन्यपूर्ण तसेच अधिक उत्पादन घेण्याचे दृष्टीकोनातून अनेक प्रगतशील शेतकरी बांधवांच्या शेतीस समक्ष भेटी दिल्या. शिवाय कृषीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले. सर्व शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून सेंद्रिय बटाट्याची माहिती घेतली. शास्त्रीय, नव तंत्रज्ञानाची जोड देत आपल्याच गावात विषमुक्त बटाटा उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले. यासाठी पाणी फाऊंडेशन टिमचे व कृषी अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि गावकऱ्याेंनी उभारलेल्या प्रयोगैाला अखेर यश प्राप्त झाले.

हे सुद्धा वाचा

T20 World Cup : न्यूझीलंड संघाच टेन्शन वाढलं! दिग्गज अष्टपैलू दुखापतीमुळे संघातून बाहेर

Harbhajan Singh : भज्जीने केला धक्कादायक खुलासा; अधिकाऱ्यांवर केलेत गंभीर आरोप

SC/ST Reservation: विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती व जमातींचा आरक्षण वाढविण्याचा घेतला निर्णय

सुरुवातीला गट शेती पद्धतीने बटाट्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले. त्यासाठी 32 शेतकरी बांधवांचा एक गट स्थापन करण्यात आला. बटाट्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे सर्व 32 शेतकऱ्यांनी 29 एकरांवर सेंद्रिय पद्धतीने बटाट्याची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी बियाणे खरेदी, सेंद्रिय खते, औषधे, यांची एकमताने निवड करून खरेदी केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच पारंपरिक शेती पद्धतीचा वापर करून, पक्षी थांबे, बीज प्रक्रिया, उगवण क्षमता, दशपर्णी अर्क, जीवामृत इत्यादी बाबींचा योग्य पद्धतीने वापर करून बटाटा उत्पादन घेतले आहे.कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा आजिबात सुद्धा वापर केला नाही.याच कारणामुळे 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन घेतले आहे.शेतकरी गट स्थापन केल्याने आणि एकजुटीने एकत्रितपणे काम केल्यामुळे आज त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. सेंद्रिय बटाट्याला सोलापूर, पुणे, मुंबई, बेळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मागणी होत आहे.परंतु कंपनी थेट ग्राहकांना विषमुक्त बटाटा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. ‘बोथे माणदेश ऍग्रो प्रोड्युसर कंपनी’ च्या माध्यमातून उत्पादन झालेला बटाटा हा विषमुक्त तपासणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. शासनाकडून सेंद्रिय प्रमाणिक प्रमाणपत्र मिळाले आहे. या गावातील बटाटा शेतीला मोठी चालना मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी