34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाT20 World Cup : न्यूझीलंड संघाच टेन्शन वाढलं! दिग्गज अष्टपैलू दुखापतीमुळे संघातून...

T20 World Cup : न्यूझीलंड संघाच टेन्शन वाढलं! दिग्गज अष्टपैलू दुखापतीमुळे संघातून बाहेर

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेल जखमी झाला आहे. त्यामुळे तो सध्या सुरू असलेली तिरंगी मालिका खेळ शकणार नाही, शिवाय त्याच्या टी20 विश्वचषकातील उपलब्धतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

सध्या जागतिक क्रिकेटमध्ये दुखापतींचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांत जगातील क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त झाल्येच्या बातम्या आल्या आहेत. यात प्रमुख नावे घ्यायची झाल्यास भारताचा जसप्रीत बुमराह, पाकिस्तानचा शाहिन आफ्रिदी, याशिवाय इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत आता न्यूझीलंड्या दिग्गज अष्टपैवू खेळाडूचाही समावेश झाला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेल शुक्रवारी (7 ऑक्टोबर) सराव सत्रादरम्यान जखमी झाला आहे. त्यामुळे तो सध्या सुरू असलेली तिरंगी मालिका खेळ शकणार नाही, शिवाय त्याच्या टी20 विश्वचषकातील उपलब्धतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

टी20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेल शुक्रवारी सराव सत्रादरम्यान जखमी झाला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला, त्यामुळे तो टी20 तिरंगी मालिकेत खेळू शकणार नाही. सरावादरम्यान फलंदाजी करताना मिशेलला दुखापत झाली आणि एक्स-रेमध्ये त्याच्या करंगळीला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, टी20 विश्वचषकातील त्याच्या सहभागावर सस्पेन्स कायम आहे.

हे सुद्धा वाचा

Harbhajan Singh : भज्जीने केला धक्कादायक खुलासा; अधिकाऱ्यांवर केलेत गंभीर आरोप

SC/ST Reservation: विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती व जमातींचा आरक्षण वाढविण्याचा घेतला निर्णय

Women’s Asia Cup 2022: पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा भारतावर ऐतिहासिक विजय; आशिया कप स्पर्धेत १३ धावांनी केला पराभव

संघाचे फिजिओ थियो कापाकौलाकिस यांनी पुष्टी केली की मिशेलला दुखापतीतून सावरण्यासाठी दोन आठवडे लागू शकतात. प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, टी20 विश्वचषकासाठी मिशेलच्या उपलब्धतेचा त्यावेळी विचार केला जाईल. हा संघ 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. स्टेडने न्यूझीलंड क्रिकेटला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “डॅरिलला दुखापत झाली आहे. तो आमच्या टी20 संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे आणि तिरंगी मालिकेत त्याच्या अष्टपैलू कौशल्याची आम्हाला उणीव भासेल.”

दरम्यान, आशिया चषक सुरू झाल्यापासून किंबहुना त्याआधीपासूनच या दुखापतीच्या सत्रांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघातील कोणता न कोणता महत्त्वाचा खएळाडू दुखापतीशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे अनेक खेळाडू केवळ दुखापतीच्या कारणावरून मोठमोठ्या स्पर्धांना मुकत आहेत. यावेळे जागतिक क्रिकेटचा स्थर देखील खालावताना दिसत आहे. विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये आयसीसी आयोजित करत असलेल्या स्पर्धांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक संघ पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धांमध्ये सहभागी दोण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, अशा स्थितीत संघातील प्रमुख खेळाडूस दुखापत झाल्यास संघाचा तोल ढासळतो. आणि स्पर्धेत एखाद्या संघाचे एकहाती वर्चस्व पाहायला मिळत असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी