राजकीय

खासदार किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा दावा, आमदार प्रताप सरनाईक यांनी कायदेशीर दंड थोपटले

टीम लय भारी

ठाणे :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैया यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय त्यांच्याविरोधात निवेदने देऊन त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले, यांनी ठाणे कोर्टात खटला दाखल केला आहे (Kirit Somaiya’s claim of Rs 100 crore, Pratap Saranaik reduced the legal penalty).

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणतात की, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांत बिनबुडाचे, निराधार आणि बेजबाबदार आरोप करून त्यांची बदनामी करण्यासाठी प्रचार केला होता. त्यानंतर आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते की किरीट सोमैया यांनी त्यांच्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर त्यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करू. त्याअंतर्गत आमदार प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमैया यांच्याविरूद्ध ठाणे कोर्टात 100 कोटी रुपयांचा विशेष दिवाणी खटला दाखल केला आहे. सोमय्या यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या निराधार आरोपांसाठी आता कोर्टाला उत्तर द्यावे लागेल.

संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्ला; चित्रा वाघ यांचे त्यावर प्रत्युत्तर

मुंबईतही चालते सावकारी, गिरगावातील सावकराच्या घरी टाकली धाड

मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून तब्बल 16 ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केले आहे. त्यात पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून सर्व अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली आहेत (All unauthorized toilet bills have also been recovered by deceiving municipal officials and submitting false documents).

याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, आमदार प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर सरकारने या प्रकरणाचा अहवालही मागवला होता. याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिकेकडून अहवाल मागवला होता आणि पालिकेने तो अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अहवालात पर्यावरणाचा ऱ्हास करून शौचालयांचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते आणि पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. सोमय्या यांचा शौचालय घोटाळा बाहेर निघाल्याने सोमय्या यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर खोटे आरोप करण्याची आणि त्यांच्या बदनामीची मालिका सुरु केली.

बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही: राज ठाकरे

Maharashtra: बीजेपी नेता किरीट सोमैया के खिलाफ 100 करोड़ मानहानि का केस, शिवसेना विधायक प्रताप सरनाइक ने दर्ज कराया मामला

किरीट सोमय्या यांनी ठाण्यात येऊन आमदार सरनाईक यांच्या विरोधात धादांत खोटे आरोप केले होते. सोमय्या यांनी आमदार सरनाईक यांच्या विरोधात बदनामी करणारे बॅनरही लावले होते. केंद्र व राज्य सरकारच्या संघर्षात महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार म्हणून केवळ राजकीय हेतूने, सरनाईक यांना बदनाम करण्यासाठी सोमय्या आरोप करीत होते. सोमय्या यांनी ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन खोटी वक्तव्ये, खोटी विधाने त्यांच्या सोयीने केली आणि त्याआधारे खोट्या बातम्या समाज माध्यमात पसरवल्या. जनतेत आमदार सरनाईक यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी, त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी सोमय्या यांनी ठरवून सर्व काही केले.

प्रताप सरनाईक आणि किरीट सोमय्या

त्यावेळी सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. तशी नोटीस आमदार सरनाईक यांनी सोमय्या यांना पाठवली होती आणि बदनामी केली म्हणून माफी मागा असे नोटिशीत सांगितले होते. सरनाईक यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला किरीट सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे बोलल्याप्रमाणे आमदार सरनाईक यांनी 100 कोटींचा दावा सोमय्यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यासाठी कोर्टात जवळपास 3 लाख इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे.

सोमय्या यांनी राजकीय द्वेषाची पातळी ओलांडून बदनामीचे घाणेरडे राजकारण केले आहे. बेलगाम खोटी विधाने करून त्यांनी अजेंडा म्हणून बदनामीची मोहीम सुरु केली. सोमय्या यांनी गेल्या 6 महिन्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत धादांत खोटी वक्तव्ये व बदनामी केली आहे. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला, माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले आहे, त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे आणि दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम 100 कोटी इतके आकारलेले आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

10 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago