राजकीय

किरीट सोमय्या यांच्या जिवीताला धोका, म्हणून ‘झेड’ सुरक्षा, भाजपचा दावा

टीम लय भारी

मुंबई : भाजप चे जेष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या बेनामी संपत्ती उघड केल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. असा दावा भाजपने केला आहे. म्हणून त्यांना झेड सिक्युरिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे (Kirit Somaiya’s life in danger, hence ‘Z’ security, BJP claims).

डिवचल्या गेलेल्या नेत्यांनी मारहाणीच्या धमक्या आणि असभ्य शिवीगाळ केल्याचे समजते. यावरून असे सिद्ध होते की मुद्देसूद लढाई मुद्दा सोडून लढली जातेय. कार्यकर्त्यांकडून मारहाणीच्या धमक्या देणे शोभत नाही. हा सारा विचार करून किरीट सोमैया यांच्या जीवाचा धोका लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या तर्फे सुरक्षेत वाढ करून ‘Z’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

भाजप सरकारने मागच्याच वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला तरीही तुम्ही भाजपाला सपोर्ट करता ?

Ola इलेक्ट्रिक बाजारात दाखल, ऑनलाइन विक्रीला सुरूवात

अर्थात अश्या भेकड हल्ले/धमक्यांना भीक न घालता किरीट सोमैया(Kirit Somaiya) आपले कार्य अजून जोमाने चालू ठेवणार आणि भ्रष्ट महाराष्ट्र सरकार मधील नेत्यांचे भ्रष्टाचार जनतेसमोर आणून भ्रष्टाचाराचे असली चेहरा जनतेसमोर उघडा पाडणार, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.

अनेक पक्षांचे आमदार, खासदार यांच्या आडून चाललेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या तसेच नियमबाह्य CRZ चे उल्लंघन करून बांधलेले रिसॉर्ट, बंगले, बोगस कंपन्यांच्या मार्फत केलेले मनी लॉन्ड्रिंग, अवैध बांधकामे केली आहेत. याविरुद्ध अक्षरशः मोहीम उघडून त्यांची सक्त वसुली संचनालाय (ED) मार्फत चौकश्यांचा ससेमिरा लावला आहे. यावरून घेतलेल्या पत्रकार परिषदा, व त्यासाठी प्रत्यक्ष बेकायदेशीर मालमत्ता ची पाहणी करून हे प्रकार माध्यमांद्वारे जनतेसमोर उघड केल्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे

संजय राऊतांचे भाजपला आवाहन, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा

किरीट सोमय्या यांच्या जिवीताला धोका

Chhagan Bhujbal owns Benami properties in Mumbai, alleges Kirit Somaiya

Mruga Vartak

Recent Posts

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

52 mins ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

1 hour ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

2 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

3 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

4 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

5 hours ago