राजकीय

भाजप आणि मनसेच्या राजकारण्यांमध्ये केमिकल लोचा झालाय : किशोरी पेडणेकर

टीम लय भारी

मुंबई : सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा ड्रामा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या भोंगा प्रकरणावरुन माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजप आणि मनसेच्या राजकारण्यांमध्ये केमिकल लोचा झालाय , असा टोला लगावलाय. हनुमान चालिसाचा आधार घेऊन काही भेसूर चेहरे महाराष्ट्र, मुंबईला तोडू पाहत आहेत. ठरवून गेम करण्याचं राजकारण सुरु आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तुम्ही कितीही गेम करा किंवा शिवसेनेला तुम्ही कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा,तुम्ही काहीह करु शकत नाही असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Kishori Pednekar criticizes Devendra Fadnavis from Babri Masjid)

‘बाबरीसंदर्भात उत्तरप्रदेशातील मागील सर्व रिपोर्ट तपासा’

मुळामध्ये बाबरीसंदर्भात उत्तरप्रदेशातील मागील सर्व रिपोर्ट तपासले पाहिजेत. त्यावेळी आम्ही २७ महिला होतो मात्र तिथे महिलांना येण्यास मनाई केली. त्यामुळे आम्ही त्याठिकाणी पोहोचलो नाही. आम्ही काही खोटं सांगणार नाही.मात्र बाबरीचा घुमट पाडल्यानंतर जी काही पळता भुई थोडी झाली. त्यावेळेस कोणीच याची जबाबदारी घेत नव्हतं पण बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: सांगितलं होय हे बाबरीचं घुमट माझ्या शिवसैनिकांनीच पाडलंय. वेळी तुम्ही का गप्प बसलात, असा सवाल पेडणेकरांनी (Kishori Pednekar) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केलाय.

‘बाळासाहेबांनी घंटा बडवणारा हिंदु नको सांगितलं होतं’

बाळासाहेबांनी घंटा बडवणारा हिंदु नको सांगितलं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी  महाराजांचा रेकॉर्ड बदलण्याचा काही राजकारणी विचार करत आहेत. मागचे अनेक इतिहासातील गोष्टी बदलून सांगण्याचं काम करतायत. तुम्हाला लोक वेडी वाटली का?,असं पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

‘सत्तेसाठी लोकांचा जीव घेणारे सुपारीबहाद्दर’

आज लोकांना कळतंय यामध्ये सुपारीबहाद्दर कोण आहेत? सत्तेसाठी कायपण करेन मग लोकांचा जीव गेला तरी चालेल मी करणारचं.असे कोण आहेत हे जनतेला माहित आहे, असा राज ठाकरे यांच्यावर किशोरी पेडणेकरांनी निशाणा साधलाय. बाबरीमशिद ज्या मशिदीवर शिवसैनिक चढले त्यांचं कौतुक केलं. तेव्हा तुमचे वरिष्ठ नेते होते. तेव्हा का गप्प बसलात. याचं पहिलं उत्तर द्या.हा प्रत्येकाच्या धर्माचा आणि प्रत्येकाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही खूप वरिष्ठ आहात खूप चांगल तुमतं राजकीय कामकाज आहे. त्यामध्ये असं काहीतरी खोटं बोलून आपली प्रतिमा बिघडवू नका, असा सल्ला किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिलाय.

तुम्ही बाबरी मशिद प्रकरणात जेलमध्ये गेला असाल मात्र तुमच्याबरोबर आमचेही लोकं होते हे विसरु नका. असे कसे स्वप्नदोष व्हायला लागले.नजरेचा दोष असे जे काही होत आहे. बाबरीसंदर्भात उत्तरप्रदेशमध्ये जे काही घडलं त्याचा रेकॉर्ड काढा. मुन्नाभाई चित्रपटात जसा केमिकल लोचा दिसतो तसा केमिकल लोचा बऱ्याच जणांमध्ये दिसायला लागलाय, अशी टीका पेडणेकरांनी (Kishori Pednekar) केली आहे.


हे सुद्धा वाचा :

 

मुंबई महापालिकेत पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार , महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईत फेब्रुवारीच्या अखेरीस सर्व कोविड-19 निर्बंध उठवेले जातील, महापौर किशोरी पेडणेकर

Hanuman Chalisa Row: Kishori Pednekar Joins Protest, Avers MP Rana ‘can’t Incite Violence’

Pratiksha Pawar

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

2 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

3 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

15 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

16 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

16 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

16 hours ago