राजकीय

महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र

टीम लय भारी

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबतच्या वादानंतर महापौरांना धमकीचे पत्र मिळाले आहे(Kishori Pednekar: Letter threatening to kill the mayor)

या पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौर किशोरी पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. या पत्राबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही९ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना घालवलं, तुम्ही कोण?; कन्हैया कुमारचा पंतप्रधानांवर निशाणा

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना

धमकीच्या पत्रावर महापौरांची प्रतिक्रिया

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “इतर पत्र येतात त्यात हे पत्र होते. हे पत्र माझ्या जुन्या घराच्या पत्त्यावर आले. याच पत्ताही थोडा चुकलेला आहे. या पत्रात अतिशय अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना मारुन टाकू, मुलाला मारून टाकू.. उडवून टाकू अशी भाषा वापरली आहे.

पत्रात आतमध्ये एकाचे नाव आहे आणि बाहेर वेगळं नाव आहे. आणि पोस्ट हे पनवेलचे आहे. पोलिसांत तक्रार दिली आहे. कारण अशी हिंम्मत जर कोण करत असेल तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल… माझ्या पक्षाचा अजेंडा असतो…मी शिवसेना पक्षाची आहे… त्यामुळे धमकावून घरी बसवणे असं जर कोणाच्या मनात असेल तर होणारचं नाही पण दखल घेतली पाहिजे. कारण माथेफिरुंची संख्य़ा कमी नाही.”

शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश; आता आश्वासनांची पुर्तता लवकर करा ! : नाना पटोले

FPJ Legal: BJP MLA Ashish Shelar moves Bombay HC for quashing of Mumbai Mayor Kishori Pednekar’s FIR

 “माझ्या दादाकडे पाहिल तर.”

यावर बोलताना महापौर पुढे म्हणाल्या की, “आशिष शेलार आणि हा वाद वेगळा आहे. कोणत्या तरी पक्षाचा हा माथेफिरु असावा पण माथेफिरुचं असावा. कारण पत्रात कोण अशी घाण भाषा वापरु शकत नाही… लिहू शकत नाही… ती लिहिली गेली. .कोणावरही संशय व्यक्त करु शकत नाही.

पत्रात शिव्यांची लाखोली वाहिली आहे. स्त्रीच्या अंगाचे प्रदर्शन आहे. माझ्या दादाकडे बघितलं तर घरातल्यांना उडवून टाकेन, मुलाला मारुन टाकेन अशी भाषा वापरली आहे. कुटुंबाबद्दल लिहिल्याने मी थोडी धास्तावली. पोलीस सुरक्षा घेणार आहे.”

यापूर्वी देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीचा कॉल आला होता. दरम्यान पोलिसांकडून या पत्राचा तपास सुरु आहे.

शिवसेना आमदार मनिषा कायंदेंकडून महापौरांना आलेल्या पत्राचा तीव्र निषेध

“एक स्त्री राजकारणात उतरतेय तिने काम करुन नये तिच्या मनाचे खच्चीकरण व्हावे अशापद्धतीने हे पत्र लिहिले आहे. याचा तीव्र संपात आणि निषेध व्यक्त करतो. किशोरी पेडणेकर अशा पत्रांना भीक घालत नाहीत. पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी जबाब नोंदवला आहे.” अशाप्रकारे शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी महापौरांना आलेल्या धमकीच्या पत्राचा तीव्र शब्दात निषेध केला.

टीम लय भारी

Share
Published by
टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

13 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

14 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 hours ago