30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयविधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना

टीम लय भारी

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे(Legislative Council elections: MVA and BJP face to face)

तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचं आव्हान आहे. काँग्रेसने ऐनवेळी छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.

शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश; आता आश्वासनांची पुर्तता लवकर करा ! : नाना पटोले

विद्यापीठातल्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायाभरणीत रायगडाची माती अन् चवदार तळ्याचे पाणी!

निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती. यामधील चार जागा बिनविरोध पार पडल्या. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे.

नागपुरात काँग्रेसने ऐनवेळी बददला उमेदवार

निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसने छोटू भोयर यांच्या जागी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने तसं पत्रक देखील काढलं आहे. छोटू भोयर यांना मात्र या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

जाणून घ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतला एकूण खर्च आणि शिल्लक

4 SP Vidhan Parishad members join BJP

नागपुरातील पक्षीय बलाबल

एकूण मतदार – ५५९

  1. भाजपा – ३१६
  2. काँग्रेस – १५०
  3. राष्ट्रवादी काँग्रेस – २४
  4. शिवसेना – २८
  5. बसप – १२
  6. शेकाप – ५
  7. स्थानिक गट – ७
  8. अपक्ष – १७

अकोला बुलडाणा वाशिममध्ये शिवसेना आणि भाजपा आमने-सामने

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढच पहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नसल्याने निकाल काय असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अपक्ष मतदार आणि वंचित बहुजन आघाडी यावेळी महत्वाची भूमिका निभावू शकतात.

पक्षीय बलाबल

एकूण मतदार – ८२२

  1. भाजपा – २४५
  2. काँग्रेस – १९१
  3. शिवसेना – १२४
  4. राष्ट्रवादी काँग्रेस – ९१
  5. वंचित – ८६
  6. एमआयएम – ७
  7. प्रहार – १

अपक्ष, स्थानिक आघाडी – ७७

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी