राजकीय

Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज; सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेना टोमणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) बारामतीमधील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्र राज्याचे विदयमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोमणा मारत म्हणाल्या आहेत की, सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. त्यापैकी एक मुख्यमंत्री सगळे सण आणि समारंभाला उपस्थित राहतील तर दुसरे मुख्यमंत्री मंत्रालयात बसून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करून त्याचे निवारण करतील. सुप्रिया सुळे घाटकोपर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, मला माझ्या व्हाट्स ऍप्पवर अनेक मेसेज येत असताात. त्यापैकी एक मेसेज असा होता की सध्या महाराष्ट्रात अशी स्थिती आहे की आपल्या राज्याला एक नाहीतर दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. कारण गणेशोत्सव (Ganesh Festival) संपल्यानंतर येत्या काळात अनेक सण येणार आहेत. त्यामुळे एक मुख्यमंत्री राज्यातील संमारंभाना हजेरी लावतील तर दुसरे मंत्रालयात बसून जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देतील. ज्याप्रकारे राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आण‍ि ज्या पद्धतीने राज्याचा कारभार चालू आहे ते फारच दुर्दैवी आणि संतापजनक आहे.

त्यांनी पुढे शिंदे सरकारवर टीका करताना म्हणाल्या की, शिंदे गटातील ४० आमदारांनी प्रत्येकी ५० कोटी रूपये घेऊन आणि सक्त वसूली संचनालय (ED) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धास्तीने महाराष्ट्रातील सत्ता बळकावली आहे. विशेषत: हे सरकार स्थापन झाल्यानंतर अडिच‍ महिने पूर्ण होऊन सुद्धा सत्तेत असलेल्या लोकांनी ‍कोणतीही लोकहितवादी धोरणे राबवलेली नाही आण‍ि कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही जे खूपच निराशाजनक आहे.

हे सुद्धा वाचा –

BMC : बीएमसीच्या परीक्षा घोटाळया विरोधात कामगार संघटना आक्रमक, परीक्षाच रद्द करण्याची केली मागणी

Virat Kohli : अजूनही माझ्यात‍ क्रिकेट बाकी; ७१ वे शतक झळकल्यानंतर‍ विराट कोहलीचं वक्तव्य

Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे राष्ट्रगीत बदलणार, चलन बदलणार, अन् सैन्यदलातील बोधचिन्ह बदलणार

मख्यमंत्री एकनाथ शिंदेनी १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून मुंबई आणि पुण्यामधील अनेक खाजगी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना भेट दिली आहे.

बुधवारी एकनाथ शिंदेनी पुण्यामधील १२ गणेशोत्सव मंडळाना भेट दिली. त्यांनी मुंबई आण‍ि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात अनेक खाजगी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.‍ त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या विरुद्ध टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदेच्या सर्व ठिकाणच्या सदिच्छा भेटींमुळे राज्यातील महत्त्वांच्या समस्यांवर त्वरीत तोडगा मंत्रालयात मुख्यमंत्रीच नसल्यामुळे लोकांची फार वाताहत होत आहे.

सुप्रिया सुळेंच्या विधानावर आक्षेप नोंदवताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, महाराष्ट्राचे पूर्वीचे मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) हे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत नव्हते परंतु राज्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांना लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची आवड आहे.

म्हस्के पुढे म्हणाले की, राज्याचे पूर्व मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) पदावर असताना कधीही घराबाहेर पडले नाही. त्यांनी घरात बसून सत्तेचा उपभोग घेतला. परंतु सध्याचे मुख्यमंत्री सगळीकडे फिरून, लोकांशी संवाद साधून त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेत आहे हे त्यांच्या विरोधकांना बघवत नाही म्हणून ते मुख्यंमत्रांवर विनाकारण टीका करत आहे.

म्हस्केंनी असा दावा केला की शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ‘लोकांच्या हिताच्या’ १३४८ फाईल्सवर सहया केल्या आहेत. यापुढेही शिंदे सरकार लोकांच्या समस्या सोडवून राज्याचे कल्याण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे.

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

3 mins ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

27 mins ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

2 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

5 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

6 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

8 hours ago