31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeसंपादकीयQueen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे राष्ट्रगीत बदलणार, चलन बदलणार,...

Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे राष्ट्रगीत बदलणार, चलन बदलणार, अन् सैन्यदलातील बोधचिन्ह बदलणार

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे ब्रिटनमध्ये अनेक बदल होणार आहेत. ब्रिटनच्या राष्ट्रगीतामधले काही शब्द देखील बदलावे लागणार आहेत. सरकारी कारभारातील अनेक गोष्टी यामुळे बदणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी राणीचे नाव आहे. फोटो आहेत त्या ठिकाणी बदल करावा लागणार आहे. हा बदल तब्बल 70 वर्षानंतर होणार आहे.

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) यांच्या निधनामुळे ब्रिटनमध्ये अनेक बदल होणार आहेत. ब्रिटनच्या राष्ट्रगीतामधले काही शब्द देखील बदलावे लागणार आहेत. सरकारी कारभारातील अनेक गोष्टी यामुळे बदणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी राणीचे नाव आहे. फोटो आहेत त्या ठिकाणी बदल करावा लागणार आहे. हा बदल तब्बल 70 वर्षानंतर होणार आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी काल निधन झाले. त्यांनी 70 वर्षे राज्यकारभार केला. एलिझाबेथ यांचे वेस्टमिंस्टर येथील बकिंघम पॅलेस येथे पार्थ‍िव ठेवण्यात आले आहे. पाच दिवसांनंतर त्यांच्यावर औपचार‍िक रित्या अंत्यसंस्कार केले जातील. तोपर्यंत तीन दिवस त्यांचे पार्थ‍िव राजवाडयात ठेवण्यात येणार असून, नागरिकांना 23 तास दर्शन घेता येणार आहे.

Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे राष्ट्रगीत बदलणार, चलन बदलणार, अन् सैन्यदलातील बोधचिन्ह बदलणार

राणी एलिझाबेथ दुसरी यांचे भारताशी चांगले संबंध होते. त्यांनी 70 वर्षे राज्यकारभार केला. महाराणी तीन वेळा भारतात येऊन गेल्या पहिल्यांदा त्यांची भेट पं. जवाहरलाल नेहरु यांच्या बरोबर झाली.‍ त्यानंतर त्यांची भेट इंदिरा गांधी यांच्या बरोबर झाली. त्यांची डाँ. राजेंद्र प्रसाद, ग्यानी झेलसिंग, के.आर. नारायण यांच्या सोबत देखील भेट झाली होती. महाराणी एलिझाबेथ यांच्या नंतर प्रिंस चार्ल्स ब्रिटनचे राजा बनणार आहेत. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये अनेक बदल होणार आहेत. ब्रिटनचे राष्ट्रगीत देखील बदल्याची शक्यता. या राष्ट्रगीतामधील ओळ बदलणार आहे. ‘गॉड सेव द क्वीन’ या ठिकाणी आता ‘गॉड सेव द किंग ‘ हे शब्द ऐकायला मिळणार आहेत. असा बदल 1952 मध्ये देखील करण्यात आला होता.

किंगच्या जागी क्वीन असा उल्लेख करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यावेळी किंग जॉर्ज यांचे निधन झाले होते. त्यानंतर एलिझाबेथ दुसरी या गादीवर बसल्या. ब्रिटनचे राष्ट्रगीत 1745 मध्ये तयार करण्यात आले. आता ब्रिटनच्या नोटा देखील बदलणार आहेत. ब्रिटनमध्ये नवीन करन्सी छापली जाणार आहे. नोटांवर आता राणीच्या जागी राजा चार्ल्स यांचा फोटो छापला जाईल. त्यांच्या जुन्या स्टँम्पमध्ये देखील बदल होणार आहेत. तसेच सुरक्षा दलांचे प्रतिक चिन्ह देखील बदणार आहेत. राणी एलिझाबेथ यांच्याकडे संपूर्ण राजघराण्याची संपत्ती आहे. ही संपत्ती 72.5 बिल‍ियन पाउंडपेक्षा जास्त आहे. ही संपत्ती त्यांना करदात्यांकडून मिळते. त्याला ‘सॉवरेन ग्रँट’ असे म्हणतात.

हे सुद्या वाचा

Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थ‍िवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

Raj Thackeray : राज ठाकरे गहिवरले…

Ganeshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी

या ग्रँटची सुरुवात किंग जॉर्ज तिसरे यांनी सुरू केली. त्यासाठी त्यांनी संसदेमध्ये एक करार मंजूर केला होता.राणी एलिझाबेथ वयाच्या 25 व्या वर्षी राज्य कारभार हाती घेतला. होता. त्या पासपोर्ट किंवा व्हिसा शिवाय अनेक देशांमध्ये सहजपणे वावरु शकत होत्या. त्या ब्रिटनमध्येच नव्हे तर 15 देशांच्या महाराणी होत्या. महाराणी राणी एलिझाबेथ दुसरी यांनी 500 डॉलरची संपत्ती मागे सोडली आहे. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्स यांना वारसा हक्काने मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी