राजकीय

Maharashtra Politics : आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवा, सत्ताधाऱ्यांकडून सामंजस्याचे पाढे

राज्यात सत्ताधारी – विरोधक यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरून जुंपत असते, मात्र यावेळी थोडं वेगळं चित्र पाहायला मिळाले ज्यामध्ये सत्ताधारी नेत्यांनी एकमेकांचीच खरडपट्टी काढल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेते समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी पडली परंतु अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीने सदर वाद शमला परंतु तरी सुद्धा अंतर्गत कुरूबुरी सुरू असल्याने राजकीय फळीतून उलट – सूलट चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या संपुर्ण प्रकरणी अमरावतीच्या खासदार आणि रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवा असा सल्लाच त्यांनी दिला.

राणा आणि कडू यांच्यातील चिघळलेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत नवनीत राणा म्हणाल्या, रवी राणा व बच्चू कडू या दोघांना विनंती आहे, की आधीच अडीच वर्ष आपल्या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे दोघांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित यायला पाहिजे. आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असे म्हणून त्यांनी विनंतीवजा सद्यस्थितीबाबत दोघांना आठवण करून देत जनतेच्या कामी लक्ष घालण्याविषयी सुचवले आहे.

हे सुद्धा वाचा…

MLA Pratap Sarnaik : शिंदेंच्या सरनाईकाचा ‘प्रताप’ उघडकीस; 11 कोटींच्या संपत्तीवर येणार जप्ती

Job Recruitement : एसबीआयमध्ये निघाली बंपर भरती

VI New Recharge Plan : ‘वीआई’ देतंय रिचार्जसोबर मोफत हॉटस्टार अन् प्राईम व्हिडिओजची मेंबरशीप

नवनीत राणा पुढे म्हणतात, अमरावती जिल्ह्यातील दोन्ही आमदार – आमदार बच्चू कडूजी आणि आमदार रवी राणाजी यांच्यात जे गैरसमज आणि विसंवाद आहे, जे मतभेद चार पाच दिवसांपासून सगळे जण पाहत आहेत, मी अमरावती जिल्ह्याची खासदार या नात्याने दोघांना विनंती करते, की गेली अडीच वर्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. आता सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहेत, तर मी कडू आणि राणा यांना जिल्ह्यातील लोकांच्या वतीने आग्रह करेन, की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काम केलं पाहिजे असे म्हणून त्यांनी हा वाद मिटवण्याची विनंतीच केली आहे.

गेली अडीच वर्ष आपले अनेक प्रश्न रखडले होते, त्यामुळे ते पूर्ण करुन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, म्हणून एक खासदार या नात्याने मी दोन्ही आमदारांना विनंती करेन की सगळे मतभेद सोडून एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, त्यासाठी विचार केला पाहिजे असे म्हणून त्यांनी वाद बाजूला ठेऊन एकत्र येण्याविषयी सूचवले आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्ती करत सदर प्रकरणावर पडदा टाकला होता परंतु तरीसुद्धा समर्थकांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात पुन्हा वयक्तिक आरोप केल्यास कोथळा बाहेर काढू असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. यावर ‘बच्चू कडू पुन्हा आमदार कसा होणार ते पाहा’ असे रवी राणा यांनी सुद्धा चिथावणीखोर वक्तव्य केले होते.

रवी राणांच्या वक्तव्यानंतर पुन्हा प्रत्युत्तर देत बच्चू कडू म्हणाले, घरात घुसून मारू, निवडणुकीत पाडू, असं आव्हान रवी राणा यांनी दिल्याचं मी मीडियावर पाहिलं. रवी राणा यांना मला मारायचं असेल तर मी 5 तारखेला घरी आहे. तेव्हा त्यांनी तलवार घेऊन माझ्या घरी यावं. मी मार खायला तयार आहे. मी राणा यांच्या तलवारीचा वार छातीवर झेलेन,’ असे म्हणून बच्चू कडू यांनी रवी राणांनी खुले आव्हान दिले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद सत्ताधाऱ्यांच्या गोटात सध्या चर्चेचा शिवाय चिंतेचा ठरत असला तरीही हा वाद नेमका कधी संपणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्या आवाहनानंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

34 mins ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

43 mins ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

2 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

2 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

2 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

3 hours ago