22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरनोकरीJob Recruitement : एसबीआयमध्ये निघाली बंपर भरती

Job Recruitement : एसबीआयमध्ये निघाली बंपर भरती

एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. लवकरच एसबीआयकडून तब्बल 1400 पेक्षा अधिक जागांवर CBO म्हणजेच सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. लवकरच एसबीआयकडून तब्बल 1400 पेक्षा अधिक जागांवर CBO म्हणजेच सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूण 1422 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबर पासून या जागेसाठीचे अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 7 नोव्हेंबर पर्यंत पात्र आणि इच्छुक वुईमेदवारांना या पदासाठीची अर्ज करता येणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र उमेदवारांना यामुळे उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. देशातील अनेक राज्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार http://sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून या पदासाठी अर्ज करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1422 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यातील 1400 पदे नियमित तर 22 पदे बॅकलॉगमधील असणार आहेत. एसबीआयकडून CBO भरती अंतर्गत या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठीची लेखी परीक्षा 4 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरून देण्यात आली आहे.

21 ते 30 वर्ष वयोगटातील पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच यासोबत इंटीग्रेडेट ड्यूल डिग्री आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

हे सुद्धा वाचा

VI New Recharge Plan : ‘वीआई’ देतंय रिचार्जसोबर मोफत हॉटस्टार अन् प्राईम व्हिडिओजची मेंबरशीप

Petrol-Diesel : आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Takeoff : अमेरिकन रॅपर टेकऑफचा गोळीबारात मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का

एसबीआयमधील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, जनरल / EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखत फेरीच्या आधारे केली जाईल. अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी आणि SBI CBO भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/sbicbosep22/ येथे क्लिक करा.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!