राजकीय

‘सत्तर वर्षे मराठ्यांचे वाटोळं कोणी केलं’? मनोज जरांगेंचा कडवट सवाल

राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) एल्गार सभा घेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात दाखल न करून घेण्याची सरकारकडे मागणी केली आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी ( १७ नोव्हेंबर) दिवशी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याबाबत आणि ७० वर्षे मराठ्यांचे वाटोळं कोणी केलं? आतापर्यंत आम्हाला खेळवत आलात. मात्र आता आम्ही फसणार नाही. एक इंचही मागे हटणार नसल्याचे व्यक्तव्य जरांगेंनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथील चौंडेश्वरी चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेत हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि ७० वर्षांमधील नोंदींबाबत वक्तव्य केलं. (Maratha Reservation)

जरांगे म्हणाले की, ७० वर्षांमध्ये ज्या नोंदी सापडल्या नव्हत्या. त्या आता सापडल्या आहेत. २४ डिसेंबरला कायदा पारित होणार आणि आरक्षण मिळणार. हे आरक्षण जर ७० वर्षांपूर्वी असते, तर जगातली सर्वात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा असती. आजपर्यंत या नोंदी कोणी दडवून ठेवलेल्या. ७० वर्षे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, याचं उत्तर मिळायला हवं.

आरक्षणासाठी सरकारने २४ डिसेंबरपर्यंत वेळ घेतला असून कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जर आरक्षण मिळाले नाही तर सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र यायचं आणि गावातल्या मराठ्यांना जागरुक ठेवायचं, असे जरांगे म्हणाले. २४ डिसेंबरला आरक्षण न मिळाल्यास समाजाला पुढील दिशा काय? हे विचारूनच ठरवणार आहे. आपलं लपून-छापून काही नसतं थेट असतं. गावोगावी साखळी आंदोलन शांततेत करायचं आहे, असे जरांगे म्हणाले.

हे ही वाचा

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची छत्रपति संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद

‘भुजबळ मंत्री असून कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही’

‘नातवाला, पुतण्याला साखर कारखाणे दिले आणि मराठ्यांच्या हातात कोयते’

मराठा समाज आता एकत्र आला आहे. मराठा समाजाने आरक्षण समजून घ्यायला वेळ लागला. यामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे. आरक्षण समजून घेऊन समाजात जागृती करा. तुमच्यात षडयंत्र रचून मतभेद तयार केले जातील. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आम्ही एकत्रित राहणार असल्याचे ठासून सांगा. हा संदेश संपूर्ण राज्यात गेला पाहिजे. लोकांच्या घराघरातील वेदना घेऊन लोकं इथे आली आहेत. त्यांची वेदना सरकारने समजून घेण्याची गरज आहे. एक दोन टक्क्यांनी पोरांचं अॅडमिशन हुकतंय. तेव्हा आई-वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. ७० वर्षात पुरावे नाहीत, म्हणून आरक्षण डावलण्यात आले. जसे आंदोलन करण्यात आले, तशी सरकारला जाग आली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात लाखोंनी नोंदी सापडत आहेत. ७० वर्षे नोंदी कोणी बुडाखाली दडवून ठेवली. ७० वर्षे तुम्ही आम्हाला खेळवत आलात. मात्र आता आम्ही फसणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. ७० वर्षे सत्तेत असणाऱ्या नेत्यांना समाजाने खूप काही दिले आहे. आता समाजासाठी काम करण्याची वेळ आली आहे. आज आमच्या लेकरांना तुमची गरज असल्याचे जरांगेंनी भरसभेत मराठा नेत्यांना साद घातली आहे.

मनोज जरांगेंनी सांगली जिल्ह्यात विटा येथे मांडलेले मुद्दे –

मराठ्यांनो, विजयाचा क्षण जवळ आला

आमचा 70 वर्षाचा बॅकलॉग कोण भरून देणार?

एकजुटीमुळे मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात

आरक्षण असताना आम्हाला का मिळाले नाही ? याचे उत्तर पाहिजे.

इथून पुढे एकानेही आत्महत्या करू नका

मेलो तरीही मराठा आरक्षणासाठी एक इंच ही मागे हटणार नाही

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

8 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

8 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

9 hours ago