राजकीय

मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं उपोषण, तारीख ठरली

राज्यात अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाची (Maratha reservation) मागणी केली आहे. मात्र सरकार केवळ आश्वासन देत असल्याचं पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारला जरांगेंनी मुदत दिली होती. मात्र सरकार यावर चिडीचूप आहे. यामुळे आता मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी बीड येथे सभा घेतली. याच बीडमध्ये मराठा समाजाने आमदारांची घरं जाळल्याची टीका काही नेत्यांनी केल्या होत्या. यामुळे ही सभा महत्त्वाची ठरली आहे. यावेळी त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. दरम्यान त्यांनी लवकरच मुंबईमध्ये आझाद मैदानावर (Azad maidan) उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे.

काय म्हणाले जरांगे-पाटील?

मी अंतरवाली सराटीमधून मुंबईला चालत जाणार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. मुंबईला जाताना वाटेत माझ्यासोबत लोकं येतील तर कोणीही हिंसा करायची नाही. मराठ्यांना कोणीही डाग लागू द्यायचा नाही. जाळपोळ, तोडफोड करायची नाही, असं जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं आहे. कोणी हिंसा केल्यास तो आपल्यातला नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; एव्हीएम असेल तर सर्व मुमकीन म्हणत संजय राऊतांचा टोला

सलमान खानची अभिषेकला जादू की झप्पी; ऐश्वर्याच्या डोकेदुखीत वाढ?

सलमान खानची अभिषेकला जादू की झप्पी; ऐश्वर्याच्या डोकेदुखीत वाढ?

आझाद मैदानावर उपोषण

आझाद मैदानावर आतापर्यंत अनेक सभा झाल्या आहेत. अनेक आंदोलनं झाली आहेत. अनेक ऐतिहासिक रणसंग्राम या आझाद मैदानावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी दिवशी मुंबईमधील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं बीडच्या सभेमध्ये सांगितलं आहे. मुंबईला जाताना ते पायी चालत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

चप्पलेनं बडवा

सभेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आता देव जरी आडवा आला तरीही आरक्षण घेणार.आपल्या पोरांना अटक झाली तर नेत्यांच्या घरी जाऊन बसा, तसेच मत मागण्यापुरते दारात आले तर चप्पलेनं बडवा, असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारवर हल्ला बोल केला आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago