29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयबॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ईव्हीएम असेल तर सर्व मुमकीन म्हणत संजय राऊतांचा...

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ईव्हीएम असेल तर सर्व मुमकीन म्हणत संजय राऊतांचा टोला

देशामध्ये काही दिवसांआधी पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये भाजपने छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये विजय मिळवला आहे. तर कर्नाटक, हिमाचल आणि तेलंगणा येथे कॉंग्रेसने आपला डंका वाजवला आहे. दरम्यान भाजप ईव्हीएम मशीनद्वारे घोळ करत असल्याचं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. यामुळे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमने निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका घ्या असं सांगितलं आहे. ईव्हीएम (EVM) असेल तर सर्व काही मुमकीन असल्याचं संजय राऊत (sanjay Raut) म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी सरकारला संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीबाबतही प्रश्न विचारला आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये येऊन उत्तर देण्याचं चॅलेंज संजय राऊत यांनी दिलं आहे. विरोधकांचं काम आहे आम्ही प्रश्न विचारणार. पण प्रश्नांना उत्तर मिळत नसतील तर आम्ही उभं राहून प्रश्न विचारणार तो संविधानाने दिलेला अधिकार असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान कॉंग्रेसचे लढवय्ये नेते म्हणून राऊतांनी सुनील केदार यांचा उल्लेख केला आहे. जिल्हा बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांची सजा झाली आहे. अशीच शिक्षा भाजपच्या काही नेत्यांना व्हायला हवी. कारण भाजपमध्येही असे काही नेते असून न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी नेत्यांवर कारवाया होत असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा

सलमान खानची अभिषेकला जादू की झप्पी; ऐश्वर्याच्या डोकेदुखीत वाढ?

साक्षी मलिकच्या निवृत्तीच्या घोषणेवर कॉंग्रेसचा नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरवर निशाणा

‘मी माफी मागणार नाही’

संजय राऊतांचा नाशिक दौरा

आज आणि उद्या संजय राऊत यांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यामुळे राजकारणामध्ये काही तरी वेगळं घडण्याची शक्यता आहे. कारण सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने यांच्यावर कारवाई करण्यात आली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. यामुळे आता संजय राऊत नाशिक दौऱ्यावर जात असल्याने अनेक चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. बडगुजर यांच्यावर मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी