29 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयसाक्षी मलिकच्या निवृत्तीच्या घोषणेवर कॉंग्रेसचा नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरवर...

साक्षी मलिकच्या निवृत्तीच्या घोषणेवर कॉंग्रेसचा नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरवर निशाणा

देशामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर लोकशाही जिवंत आहे का? असा सवाल विचारला जात आहे. भाजप नेते आणि कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधामध्ये काही महिला कुस्तीपटूंनी महिलांच्या लैंगिक शोषणावरून आंदोलन केलं होतं. तरीही त्यांच्यावर एफआरआय दाखल करण्यात न आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा बृजभूषणचे निकटवर्तीय संजय सिंह हे कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याची माहिती समोर येताच साक्षी मलिकने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi), अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh bacchan) आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) यांनी साक्षी मलिकचं कौतुक केलं, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये यावर कोणीच काही बोलत नसल्याने कॉंग्रेसने या तिघांना धारेवर धरलं आहे.

साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळामध्ये ब्रॉंझ पदक पटकावले होते. यावेळी संपूर्ण भारतभर साक्षी मलिकचे कौतुक करण्यात आलं होतं. अनेक सेलिब्रिटींनी साक्षी मलिकवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र आता क्रीडा क्षेत्रामध्येही राजकीय नेत्यांचं गैरवर्तन दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे साक्षी मलिकने दोन दिवसांआधी कुस्ती क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. तिला आता बृजभूषणचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुस्ती खेळायची नसल्याने तिनं हा निर्णय घेतला आहे. मात्र यावर याआधी साक्षीचे कौतुक करणारे कोणीच बोलत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा

विवेक बिंद्रानं पत्नीवर उचलला हात; कानाचा पडदा फाटेपर्यंत जबर मारहाण

उद्धव आणि राज एकत्र; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

‘मी माफी मागणार नाही’

अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर चिडीचूप

याआधी साक्षी मलिकचे कौतुक करणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, ‘तु मलिक साक्षीला आहेस देशातील महिला प्रभळ आहेत. त्यांचा सन्मान आणि रक्षा करणं भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे’, असे ट्विट याआधी अमिताभ बच्चन यांनी लिहिलं होतं. यानंतर सचिन तेंडुलकरनेही रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने केलेल्या कामगिरीचे कौतुक केलं आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या क्रीड क्षेत्रामध्ये साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली, मात्र सध्या यावर ना अमिताभ बच्चन ना सचिन तेंडुलकर कोणीच काही बोललं नाही.

नरेंद्र मोदीचं मौन

तर यानंतर नरेंद्र मोदींनीही त्यावेळी रक्षाबंधन दिवशी साक्षी मलिकने ब्रॉंझ पदक जिंकलं, हे आपल्या देशासाठी गर्वाची बाब असल्याचं ट्विट केलं होतं, मात्र सध्या साक्षी मलिकवर कोणत्याच नेत्याने एकही अक्षर न काढल्याने कॉंग्रेसने या तिनही प्रतिष्ठित व्यक्तींना धारेवर धरलं आहे. त्यांनी हे ट्विट करत आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी