राजकीय

आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला

टीम लय भारी

मुंबई : राज्यात बंडखोरी केलेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक पेटून उठले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने, तोडफोड करण्यात आली आहे. इतकेच काय तर, काही शिवसैनिकांनी तर बंडखोर आमदारांना मारण्याची धमकी देखील दिली आहे. पण या सर्वचत एक गोष्ट मात्र खरी, की आमदार जरी पक्षातून फुटले असले तरी, कट्टर शिवसैनिक आजही पक्षातच आहेत. काही शिवसैनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून बंडखोरांचा चांगलाच खरपूस समाचार घेताना दिसत आहेत.

शिवसेनेकडून विजयी झालेले मात्र आता शिंदे गटात असलेले पालघर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्टमधून श्रीनिवास वनगा यांच्या फोटोवर गद्दार असे लिहिण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे हि पोस्ट श्रीनिवास वनगा यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आली नाही. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांनी जरी बंडखोरी केलेली असली तरी, त्यांचे अधिकृत फेसबुक पेज चालवणारी व्यक्ती मात्र आजही शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे पाहायला मिळाले आहे.

या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या फेसबुक पेजवर फोटो पोस्ट करून त्यावर गद्दार असे तर लिहिण्यात आलेच आहे. परंतु या पोस्टमध्ये ‘शिवसेना आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर निवडून येऊन सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी, सामान्य जनतेसोबत लबाडी करणारा स्वार्थी श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार’ असे देखील लिहिण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

VIDEO : ‘काय झाडी, काय डोंगार… शहाजी पाटलांनी एकनाथ शिंदेंना ऐकवला आपला फेमस डॉयलॉग

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे पती सदानंद सुळेंशी भांडण झाले तर…

नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी लावली भांडणे

पूनम खडताळे

Recent Posts

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण…

2 mins ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

2 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

2 hours ago

अखेर हेमंत गोडसे यांना नाशिकमधून महायुतीची उमेदवारी

शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse candidature ) यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा…

2 hours ago

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा; नरेन्द्र मोदी

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…

3 hours ago

विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे उत्तर द्यावे:डॉ.भारती पवार

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…

3 hours ago