राजकीय

खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीतील आश्वासनांचा विसर

टीम लय भारी

पिंपरी: शिरूरचे खासदार कोल्हे व माजी खासदार आढळराव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांनाच विसर पडला असल्याचा टोला माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी लगावला आहे.( MP Amol Kolhe forgets election promises)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये कोल्हे यांनी मतदारांना दिलेली आश्वासने त्यांनाच अडचणीची ठरताना दिसत आहे. त्यांचे पहिले आश्वासन होते की, हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि सर्वकाल तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार. पुण्याच्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला तो शब्द सत्यात उतरवावा, असं खुलं आव्हान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी  खासदार अमोल कोल्हे  यांना दिलंय.

आढळराव म्हणाले, बैलगाडा शर्यतींसाठी खासदार कोल्हे यांना जाहीर आमंत्रण दिले होते. तुम्ही बैलगाडा शर्यतीसाठी या. तुम्ही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी का होईना, लांडेवाडीत आमच्या घाटात या आणि घोडीवर बसा, असे आमंत्रण त्यांना होते. मात्र, ते आले नाहीत आणि येणार नव्हतेच, असे आढळराव म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Dr. Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंना मतदारसंघात हवीय चित्रनगरी, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय; खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य

अमोल कोल्हेंच्या चित्रपटातील भूमिकेविरोधात संमिश्र राजकीय प्रतिक्रिया

Swarajya Saudamini Tararani: Amol Kolhe is delighted to play Chhatrapati Shivaji Maharaj’s role yet again

अमोल कोल्हे हे देखील म्हणाले ज्या दिवशी बैलगाडा शर्यती सुरू होतील, तेव्हा हा तुमचा पठय़ा, शर्यतीतील पहिल्या बारीसमोर घोडी धरणार, हे त्यांचे दुसरे आश्वासन होते. मात्र, या दोन्ही आश्नासनांचे पालन त्यांच्याकडून झाले नाही. त्यावरून आढळराव व त्यांच्या समर्थकांकडून कोल्हे यांची मतदारसंघात खिल्ली उडवली जात आहे. तूर्त आढळरावांच्या टीकेवर खासदार कोल्हे यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.

Pratikesh Patil

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

5 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

23 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

3 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago