33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयDr. Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंना मतदारसंघात हवीय चित्रनगरी, मुख्यमंत्र्यांकडे केली...

Dr. Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंना मतदारसंघात हवीय चित्रनगरी, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

संजय बारहाते : टीम लय भारी

शिरूर : माझ्या मतदारसंघातील माळशेज परिसरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण होते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी प्रकल्प राबवा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Dr. Amol Kolhe ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही मागणी केली.

‘लॉकडाऊन’ शिथिल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाट्य, चित्रपट व मालिका निर्मात्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती.

Dr. Amol Kolhe

या बैठकीत आपली भूमिका मांडताना डॉ. कोल्हे ( Dr. Amol Kolhe ) म्हणाले की, रोजगाराच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसह इतर ठिकाणी देखील चित्रिकरण करण्यासाठी चित्रनगरी प्रकल्प राबवता येऊ शकेल. कोल्हापूर प्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण जुन्नर लगतच्या माळशेज परिसरात होत असते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी उभारण्यात यावी.

‘लॉकडाऊन’मुळे संपूर्ण हंगाम बुडाल्याने अडचणीत आलेल्या तमाशा फडमालकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

‘कोरोना’ संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री ( Dr. Amol Kolhe ) उद्धव ठाकरे यांनी नाट्य, चित्रपट व मालिका निर्माते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान डॉ. कोल्हे यांनी ही मागणी केली.

ते पुढे म्हणाले की, तमाशा व्यवसायाचा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या काळात यात्रा – उत्सवांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तमाशा कार्यक्रमातून फंडांचा वर्षभराचा खर्च भागवला जातो. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या यात्रा – उत्सवांना प्रशासनाने परवानगी नाकारली.

Lockdown4.0
जाहिरात

तमाशाचा संपूर्ण हंगाम बुडाला. परिणामी तमाशाचे फड, त्यात काम करणारे कलावंत त्यांचे कुटुंबीय आदींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे, याकडे डॉ. कोल्हे ( Dr. Amol Kolhe ) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.

आर्थिक अडचणीत असलेल्या फडमालकांना आर्थिक आधार दिला नाही, तर महाराष्ट्राची परंपरा असलेली ही लोककला धोक्यात येईल अशी भीतीही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक संपताच फडमालकांना विनातारण कर्ज देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले.

हे सुद्धा वाचा

VIDEO : ‘कोरोना’च्या खबरदारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंचे बहुमोल ६ संदेश, प्रत्येकाने ऐकायलाच हवेत !

Lockdown4.0 : गृह राज्यमंत्री शंभुराजेंच्या जिल्ह्यातच भाजपकडून लॉकडाऊनची ऐशीतैशी, मंत्री महोदय चिडीचूप

ExplainSpeaking: Why Atmanirbhar Bharat Abhiyan economic package is being criticised

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी