राजकीय

‘ठाकरे सरकार म्हणजे, नळाच्या तोट्या घेऊन जाणारा भाडेकरू’

टीम लय भारी

मुंबई : भाडेकरू घर सोडतो तेव्हा जाताना नळाच्या तोट्याही घेऊन जातो. उत्तर प्रदेशच्या एका पायउतार सरकारच्या मंत्र्यांनी असेच केले होते. उद्धव ठाकरे सुद्धा तेच करीत असल्याची बोचरी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली असून त्यात महत्वाचे काही निर्णय घेतले जाणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. सरकार अल्पमतात आले तरी केवळ एका व्यक्तीच्या मुख्यमंत्रीपदासाठी ते टिकवून ठेवायला हवे का ? एका व्यक्तीला खुर्ची तुटेपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहू द्यावे का ? एका व्यक्तीचा मुखूट शाबूत राहावा म्हणून बहुमत चाचणी घ्यायला नको का ? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी अस्थिर सरकारवर केली.

राज्यातील आरोग्य, शिक्षण, शेती असे महत्वाचे प्रश्न सुटावेत म्हणून सरकार चालवले जाते. एखाद्या व्यक्तीने मुखुट घालावा म्हणून सरकार नसते, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला.

भाजपची भूमिका काय असे विचारले असता, मुनगंटीवार म्हणाले की, जशी प्रश्नपत्रिका येईल, तशी ती आम्ही सोडवू. आता बहुमताची प्रश्नपत्रिका आहे. ती सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. आमच्यासमोर अजून प्रश्नपत्रिका आलेली नाही.

हे सुद्धा वाचा :

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?

जय श्रीराम, टाटा…बाय बाय.. सुधीर मुनगंटीवारांनी ‘महाविकास आघाडी’ला हिणवले

‘बंडखोर आमदार मस्त, आनंदी अन् समाधानी’

संदिप इनामदार

Recent Posts

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

10 mins ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

21 mins ago

नाशिक महापालिकेतील भूसंपादन घोटाळा मंगळवारी उघड करणार; संजय राऊत

पाऊस आला तरी थांबा; जाऊ नका... सत्तेवर येण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल, अशी भावनिक साद घालत…

34 mins ago

९०० मीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : मतदानाच्या दिवशी अवकाळीचे ढग दाटून येण्याचा अंदाज

राज्याच्या हवामानात ( weather) अचानकपणे बदल होऊ लागला आहे. येत्या १८मेपर्यंत संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह उत्तर,…

50 mins ago

मतदान जनजागृतीच्या घोषणांनी नाशिक शहर दुमदुमले

नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय आणि किंग्स ऑफ रोडस व सुपर बाइकर्स…

1 hour ago

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसआरपीएफच्या पाच तुकड्यांचा आढावा;पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये येत्या बुधवारी (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र…

1 hour ago