35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीय‘ठाकरे सरकार म्हणजे, नळाच्या तोट्या घेऊन जाणारा भाडेकरू’

‘ठाकरे सरकार म्हणजे, नळाच्या तोट्या घेऊन जाणारा भाडेकरू’

टीम लय भारी

मुंबई : भाडेकरू घर सोडतो तेव्हा जाताना नळाच्या तोट्याही घेऊन जातो. उत्तर प्रदेशच्या एका पायउतार सरकारच्या मंत्र्यांनी असेच केले होते. उद्धव ठाकरे सुद्धा तेच करीत असल्याची बोचरी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली असून त्यात महत्वाचे काही निर्णय घेतले जाणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. सरकार अल्पमतात आले तरी केवळ एका व्यक्तीच्या मुख्यमंत्रीपदासाठी ते टिकवून ठेवायला हवे का ? एका व्यक्तीला खुर्ची तुटेपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहू द्यावे का ? एका व्यक्तीचा मुखूट शाबूत राहावा म्हणून बहुमत चाचणी घ्यायला नको का ? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी अस्थिर सरकारवर केली.

राज्यातील आरोग्य, शिक्षण, शेती असे महत्वाचे प्रश्न सुटावेत म्हणून सरकार चालवले जाते. एखाद्या व्यक्तीने मुखुट घालावा म्हणून सरकार नसते, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला.

भाजपची भूमिका काय असे विचारले असता, मुनगंटीवार म्हणाले की, जशी प्रश्नपत्रिका येईल, तशी ती आम्ही सोडवू. आता बहुमताची प्रश्नपत्रिका आहे. ती सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. आमच्यासमोर अजून प्रश्नपत्रिका आलेली नाही.

हे सुद्धा वाचा :

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?

जय श्रीराम, टाटा…बाय बाय.. सुधीर मुनगंटीवारांनी ‘महाविकास आघाडी’ला हिणवले

‘बंडखोर आमदार मस्त, आनंदी अन् समाधानी’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी