34 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीय‘बंडखोर आमदार मस्त, आनंदी अन् समाधानी’

‘बंडखोर आमदार मस्त, आनंदी अन् समाधानी’

टीम लय भारी

मुंबई : सगळे आमदार मस्त फिरताहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आहे. कुणाला तरी जबरदस्तीने येथे आणल्याचे दिसत नाही, अशी माहिती बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. बंडखोर आमदारांनी आज गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बंडखोर आमदारांना गुवाहाटीला जबरदस्तीने नेले आहे. त्यांना तिथे कोंडून ठेवले आहे, असा आरोप शिवसेनेकडून केला जात होता.

त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना ही माहिती दिली. शिंदे म्हणाले की, आमच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. दोन तृतियांश पेक्षा जास्त संख्याबळ आहे. बहुमत व संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे बहुमत चाचणीची आम्हाला चिंता नाही. आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. बाळासाहेबांच्या स्मृतीथळाचे दर्शन घेऊ, शिवाजी महाराज व आनंद दिघेंना वंदन करू, अन् विधानसभेत बहुमताला सामोरे जाऊ, असे बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. ही शिवसेना हिंदुत्वाला पुढे नेणारी आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम व्हायला हवे. महाराष्ट्रातील जनता सुखी व्हायला हवी. महाराष्ट्राला आम्ही प्रगतीपथावर नेणार आहोत. सदनाच्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.

आसामसाठी ५० लाख रुपयांची देणगी

सर्व बंडखोर आमदार आज गुवाहाटीवरून गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आसामसाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली. गुवाहाटीच्या मुक्कामात आम्हाला आसामच्या जनतेकडून आपुलकी मिळाली. म्हणून शिंदे यांनी ५० लाख रूपये दिल्याचे बंडखोरांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे दर्शन घेणार, अन् बहुमताला सामोरे जाणार

ईशा अंबानीकडे रिटेल व्यवसायाची सूत्रे

अस्थिर सरकारने काढले 443 जीआर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी