राजकीय

‘महाविकास आघाडी सरकार’चा ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या योजनेवर वरवंटा !

तुषार खरात : टीम लय भारी

मुंबई : स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे, तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा सांगणारे ‘महाविकास आघाडी सरकार’ जातीयवादी वागत आहे. इतर मागासवर्गीय, भटके व विमुक्त या वर्गातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या बाबतीत आघाडी सरकारने हा दुजाभाव दाखविला असल्याचे समोर आले आहे(MVA government poured water on scheme of OBC and NT).

इतर मागासवर्गीय, भटके व विमुक्त प्रवर्गासाठी बहुजन विकास खात्याकडून योजना राबविल्या जातात. त्यानुसार या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफी व शिष्यवृत्ती योजना कार्यरत आहे. पण अवघ्या ६२८ अभ्यासक्रमांसाठीच ही योजना राबविण्यात येते.

दुसऱ्या बाजूला सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी २५५७ अभ्यासक्रमांना ही योजना लागू आहे. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमांनाही ही योजना लागू करण्याचे ‘शहाणपण’ बहुजन विकास खात्याला आलेले नाही.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने ३०० अभ्यासक्रमांना शुल्क माफी व शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. बहुजन विकास खात्याने मात्र एकही नवीन अभ्यासक्रम सुरू केला नसल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

हे सुद्धा वाचा

सर्व ठिकाणी मी मास्क वापरतो, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा खुलासा

ठाकरे सरकारच्या निर्णयावर संभाजी छत्रपतींची भूमिका स्पष्ट

मेडिकल कोट्यात OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

State Backward Class Commission aims to complete survey in April

सध्याच्या डिजिटल युगात नवनवीन अभ्यासक्रमांची भर पडत आहे. योग्य करिअरसाठी नव्या जमान्याचे अभ्यासक्रम निवडणे गरजेचे बनले आहे. परंतु अशा आधुनिक अभ्यासक्रमांना सवलती देण्यात बहुजन विकास खात्याने आखडता हात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्री विजय वडेट्टीवार यांची अकार्यक्षमता

बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार ओबीसींच्या हिताबाबत पोटतिडकीने बोलत असतात. पण या प्रवर्गासाठी सरकारी योजना राबविण्यासाठी फार कष्ट घेत नाहीत. शुल्क माफी व शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ते फार तसदी घेत नसल्याचे सूत्रांनी सांगितले (Inefficiency of MVA government’s Bahujan Vikas Minister Vijay Vadettiwar).

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

11 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago