29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजसर्व ठिकाणी मी मास्क वापरतो, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा खुलासा

सर्व ठिकाणी मी मास्क वापरतो, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा खुलासा

टीम लय भारी

नाशिक : नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना १९ विषयक घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपला मास्क काढून ठेवल्यामुळे ते यापुढे मास्क वापरणार नाहीत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये उमटल्या. मात्र जिल्हाधिकारी मांढरे यांनी, मी अत्यंत काळजीपूर्वक सर्व ठिकाणी मास्क वापरतो, असा खुलासा केला आहे. या बैठकीत रामकुंडासारख्या धार्मिक तीर्थस्थळांवर शिस्तपालनासाठी अधिक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा, तसेच प्रवेशद्वार नसलेल्या उघड्यावरील पर्यटनस्थळांवर जिल्ह्यात बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. (Collector Suraj Mandhare’s explanation)

सूरज मांढरे गेली दोन वर्षे जिल्ह्यात कोरोना काळात विविध उपाययोजना राबवत आहेत. गेल्या वर्षी मालेगावमध्ये देशात सर्वाधिक कोरोना संसर्ग झाला असतानाही मांढरे यांच्या निर्देशांखाली त्यावर प्रशासनाने योग्य रीतीने नियंत्रण मिळविले होते. यातून जिल्हाधिकारी मांढरे यांनी आपण शास्त्रीय उपाययोजनांबाबत अधिक सजग असतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिले होते. मात्र मास्क न घालण्यावरून समाजमाध्यमांवर उमटलेल्या उलटसुलट प्रतिक्रियांवर ते म्हणाले, `मी मास्क घालणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे काय` अशी विचारणा होत आहे. या विचारण्यामागचे कारण काय आहे, हे माझ्या आकलनात येत नाही आहे. माझ्याकडून कोणतीही खातरजमा न करता हे वार्तांकन केलेले दिसून येत आहे. मांढरे पुढे म्हणाले, मास्क न घालण्याचा असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाहीये. याउलट मी सर्व ठिकाणी जाताना अत्यंत काळजीपूर्वक मास्क घालत आहे आणि हे सर्व जणांना माहीत आहे. उलट सर्वांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या कोरोनाच्या नियमांचे योग्य रीतीने पालन करणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण करून घेणे हाच कोरोनापासून अपले रक्षण होण्याचा योग्य उपाय आहे, त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.

नाशिक शहर जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांबाबत फेरविचार करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेतली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.  तर अनेक अधिकारी बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत होत असलेल्या लक्षणीय वाढीमुळे रामकुंडासारख्या धार्मिक तीर्थस्थळांवर शिस्तपालनासाठी अधिक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा, तसेच प्रवेशद्वार नसलेल्या उघड्यावरील पर्यटनस्थळांवर जिल्ह्यात बंदी घालण्याचा निर्णय या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील केमिस्टकडून कोविड स्व-चाचणी किट खरेदी करण्यासाठी आता आधार कार्ड आवश्यक

छगन भुजबळांचा आदेश, नाशिकमध्ये पर्यटनावर बंदी

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maha: Nashik sees 1,989 new cases of COVID-19; one casualty

या वेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिवसाला हजार ते दीड हजाराच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. नाशिक शहर, निफाड, दिंडोरी तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र होमक्‍वारंटाइन असलेले रुग्ण बरे होत आहेत ही बाब समाधानाची असल्याचे ते पुढे म्हणाले. त्याचबरोबर भुजबळ यांनी निफाड, दिंडोरीसह नाशिक शहरात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या व्‍यक्तींबाबत अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ते म्हणाले की, प्रवेशद्वाराची सोय असलेल्या पर्यटनांची ठिकाण यापूर्वीच बंद केली आहे. मात्र उघड्यावरील गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्याची गरज आहे. त्यामुळे धऱणासह उघड्यावरील पर्यटन स्थळ बंद केली जाणार आहे. नाशिकला रामकुंड हे देशातील धार्मिक तिर्थक्षेत्र असून तेथे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तेथे पोलीस व महापालिका यंत्रणेने एकत्रितपणे उपाययोजना करून विधींना प्रतिबंध न करता तेथील नियम अधिक काटेकोरपणे राबवावेत, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या लाटेत देशभरात मालेगावमध्ये रुग्णसंख्या लक्षणीय होती. मालेगाव भागात कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. मात्र त्याच मालेगावमध्ये सध्या जेमतेम १३८ रुग्ण आहेत. यामागे तेथे अँटिबॉडी विकसित झाली का, याचा अभ्यास सुरू आहे. तसेच मालेगाव मॅजिकचे सूत्र शोधण्याचे काम सुरू असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी