टॉप न्यूज

माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप जठार, सचिवपदी विशाल माने यांची निवड

टीम लय भारी

म्हसवड : माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारीणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. संघाच्या अध्यक्षपदी संदीप जठार, सचिवपदी विशाल माने, उपाध्यक्षपदी पोपट बनसोडे व दौलत नाईक, तर खजिनदारपदी बापूसाहेब मिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे(Maan Taluka Marathi Press this time president Sandeep Jathar).

संघाच्या वतीने म्हसवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. माण तालुका (सातारा) हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. दुष्काळाचे वार्तांकन करून स्थानिक जनतेला दिलासा देण्याचे काम पत्रकार करीत असतात(Maan taluka (Satara) is known as drought prone).

स्थानिक जनतेला बातम्यांच्या माध्यमातून न्याय देणे, तसेच पत्रकारांच्याही न्याय हक्कासा संघटीतपणे लढा देणे यासाठी संघ अविरतपणे काम करीत राहील, अशा भावना नवनियुक्त अध्यक्ष संदीप जठार यांनी व्यक्त केल्या(Newly appointed President Sandeep Jathar expressed his sentiments).

यावेळी संघाचे संस्थापक पोपट बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार दौलत नाईक, राजेश इनामदार, अजित काटकर, अजित कुंभार, सागर बाबर, विजय भागवत, शिवशंकर डमकले, जयराम शिंदे, विशाल माने, राजेंद्र केवटे, धनंजय पानसांडे, सचिन मेनकुदले, सिद्धार्थ सरतापे, सुशील त्रिगुणे, केराप्पा काळेल, अशोक हांडे, योगेश गायकवाड, दिलीप कीर्तने, आकाश दडस, विजय ढालपे, अहमद मुल्ला आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

सर्व ठिकाणी मी मास्क वापरतो, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा खुलासा

मुंबई विद्यापीठातील १७८ महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कामाचा धडाका, एकही फाईल प्रलंबित नाही

Maharashtra to take call on reopening of schools in next 15 days

यावेळी उपाध्यक्ष पोपट बनसोडे म्हणाले की, ही संघटना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. ग्रामीण भागातील मराठी पत्रकार संघ न्यायासाठी कार्यरत राहणार आहे.
सचिव विशाल माने म्हणाले की, आमची संघटना सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी व परिसरातील अन्यायग्रस्त नागरिकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासन दरबारी आवाज उठवण्याचे काम करणार आहे.

यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ.शशिकांत शिंदे साहेब ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,माजी मंत्री व रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर,शिवसेना नेते शेखर गोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, युवक राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अभय जगताप, युवक राष्ट्रवादी माण तालुका अध्यक्ष विक्रम शिंगाडे, युवक उपाध्यक्ष समर्थ जाधव, माणदेशी महिला बँक संस्थापक अध्यक्ष चेतना सिन्हा, रणजित देशमुख यांनी आभिनंदन केले.

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

3 hours ago

नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

4 hours ago

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्यात पडून बहीण-भावाचा म़ृत्यू

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…

4 hours ago

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…

4 hours ago

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणी दोघांना अटक

सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…

4 hours ago

चक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…

4 hours ago