राजकीय

नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात ,शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे असल्याचे भाजपकडून भासवले जाते

टीम लय भारी

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यांरी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने सभागृहात एकच गोंधळ झाला आणि या विरोधामुळे राज्यपाल आपले आभिभाषण सोडून गेले. या सर्व प्रकरणावरती पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.(Nana Patole lashes out at BJP)

पटोले म्हणाले, ‘राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी अभिभाषण केवळ 5 मिनिटात संपवले आणि सभागृह सोडलं. ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत. बेळगावमध्ये छत्रपतींची विटंबना करतात. स्वत: राज्यपाल अपमानास्पद वाक्य बोलतात. राज्यपालांनी जनतेची माफी मागावी, तसंच शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे असल्याचं भाजपकडून कायम भासवलं जातं, आणि हे आम्ही कधीही स्विकारणार नसल्याचं ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद बोलणं. ज्योतिबा फुले यांच्याबदद्ल बोलणं ते कसे बोलू शकतात. राज्यपालांनी महाराष्ट्रातून जावे, कोश्यारींना परत पाठवण्याबाबत आम्ही कायदेशीर तपासणी करत आहोत. दरम्यान, ‘नवाब मलिक यांच्यावर आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. मग इक्बाल मिर्चींचे पैसे कुणी घेतले. फडणवीसांनी आरोप करण्या आधी ते मुख्यमंत्री असताना किती आरोप केले त्यांनीच प्रत्येकाला क्लिन चिट दिली. अशी टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली.

हे सुद्धा वाचा

राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे : नाना पटोले

“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले : नाना पटोले

At ‘Parivartan rally’, Nana Patole urges workers to bring Congress back to power in PMC

Pratikesh Patil

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

40 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

1 hour ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago