राजकीय

भाजप नेत्याचे धक्कादायक विधान, राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांचं नाव सुवर्ण अक्षराने नाही तर डांबराने लिहिलं जाईल

टीम लय भारी

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरल्याचं पाहायला मिळालं. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी सरकारला घेरलं. तर राज्यपालांनी शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.(Shocking statement of BJP leader)

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं. ते पिल्लू वळवळ करत होतं. आता आमच्यावरच फुत्कारत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बाळासाहेबांनी भाजप आणि शिवसेनेची युती केली होती. त्यामुळे सापाशी युती बाळासाहेबांनी केली का? हे सांगाव, असा प्रश्न भातखळकर यांनी भाजप-सेनेच्या युतीबद्दल बोलताना उपस्थित केला आहे. तर राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांचं नाव सुवर्ण अक्षराने नाही तर डांबराने लिहिलं जाईल, असा घणाघात भातखळकरांनी केला.

हे सुद्धा वाचा

राज्याबाहेर काही घडलं की या बाप लेकीची जोडी आवाज उठवते; भाजप नेत्याचा पवार कुटुंबीयांवर निशाणा

बीएमसीची निवडणूक शिवसेना ,भाजपसाठी ‘वादळी’ ठरणार

भाजपचा धक्कादायक आरोप, नवाब मलिक डान्सबार चालवायचे

UP elections: Can Yogi Adityanath help BJP repeat its 2017 dominance in Phase 6 seats?

अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या घोषणेबाजीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण अर्ध्यावर सोडलं आणि निघून गेले. राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीत आमदार आक्रमक झाले आहेत तर भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच मलिकांविरोधात घोषणाबाजी केली.

Pratikesh Patil

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

9 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

9 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

9 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

9 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

9 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

13 hours ago