राजकीय

मुलींना गायब करणारी टोळी: डबल इंजिन सरकार नक्की करतेय तरी काय? नाना पटोले कडाडले

महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातून समोर येत आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून गेल्या दोन वर्षांत 60 हजार 435 महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशला मागे टाकत महिला गायब होण्यामागे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असणे ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र राज्यातून दररोज 70 मुली गायब होत असून हे कोणाचे रॅकेट आहे, असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी उपस्थित केला, डबल इंजिन सरकारला नक्की करतेय तरी काय? मुलींना गायब करणारी टोळी असेल तर पोलिसांनी या टोळीला पकडणे आवश्यक आहे, असेही पटोले यांनी  सांगितले.

ते म्हणाले, काश्मीरमध्ये काश्मीर पंडितांचा खून होत आहे. काश्मीरमध्ये काश्मीर पंडित असुरक्षित आहेत. यावर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाहीत असा आमचा प्रश्न आहे. या पद्धतीच्या धार्मिक भावना भडकून जनतेचे मूळ मुद्दे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, छोट्या दुकानदारांचे प्रश्न, ज्याची स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी 2014 साली देशाचे पंतप्रधान झाले, भाजप सत्तेमध्ये आले, हे मुद्दे बाजूला ठेवून अशा पद्धतीचे मुद्दे समोर आणून जनतेची दिशाभूल करण्याचं करत आहेत आणि हे जनतेने ओळखले आहे, असे यावेळी पटोले यांनी सांगितले.

पुढे पटोले म्हणाले, महाराष्ट्र राज्यात डबल इंजिनचे सरकार या राज्यात महिलांची सुरक्षा करू शकत नाही. महाराष्ट्रातील दररोज 70 महिला गायब होत आहे हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला गायब हो असतील आणि त्यांच्यावर अत्याचार केला जात असेल पुरोगामी विचारांचा शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा अपमान केल्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. मुलींना गायब करणारी जी टोळी असेल त्यांना ताब्यात घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

केरळ स्टोरी बाबत भाजपने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना, केरला स्टोरी प्रकरणी कोर्टाने हे काल्पनिक आहे, वस्तू स्थितीला आधारित नाही असे सांगितले मात्र भाजपला या सगळ्या गोष्टी वास्तविक दाखवून धार्मिक वाद आणि सामाजिक वाद निर्माण करण्याचे काम करतेय. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम ते करत असल्याची टीकाही पटोले यांनी केली.

हे सुद्धा वाचा :

राजकीय भूकंप: जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला होणार; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निकाल

Viral Video : मोबाईल चोराची जबरदस्त पब्लिक धुलाई पाहा

Racket behind disappearance of women in Maharashtra? Question by Nana Patole

Team Lay Bhari

Recent Posts

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

21 mins ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

13 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

13 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

14 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

14 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

20 hours ago