राजकीय

माजी आमदार नारायण पाटील सुसाट, संजयमामा शिंदेंना केले सपाट!

करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडून होत असलेल्या विकासकामांमुळे पाटील गटाचे वर्चस्व वाढत चालल्याचे दिसत आहे. अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांची त्यामुळे चांगलीच नाकाबंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे सत्तेत नसतानाही पाटील यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा वाढत आहे. तालुक्यातील १० गावांमधील रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ४६ लाख रूपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आणखी पाच कोटी रुपयांच्या कामांनाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील गटाचे राजकीय वजन (Political Influence) वाढत असल्याचे चित्र आहे. नारायण पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक पाहता स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत. त्यामळे शिंदे यांच्या गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. (Narayan Patils political influence in Karmala Constituency)

राज्यात सत्तापालट झाल्यांनतर येथील स्थानिक राजकारणात उलथापालथ झाली आहे. करमाळा तालुक्यातील राजकारणात मात्र नारायण पाटील यांच्या गटात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण पाटील यांच्यातील मधुर संबांधांमुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आदिनाथ कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी ‘आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका’, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना दिली. या राजकीय घडामोडीनंतर काही दिवसांनी आमदार शिंदे यांनी तालुक्यातील दौऱ्याला सुरुवात केली.

नारायण पाटील यांना डिवचण्यासाठी त्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या गावांपासूनच या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. हा राजकीय दौरा नसून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे, असा प्रचार शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. मात्र, जनतेची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. कुकडीच्या पाण्यासंदर्भात आमदार शिंदे यांनी केलेले विधान त्यांच्याच अंगलट आले. या विधानावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच कोंडीत पकडले. त्यांच्या या विधानावर पाटील गटाने टीकेची झोड उठवली.

शिंदे यांना नारायण पाटील यांचा शह

आमदार शिंदे यांचा दौरा सुरु असतानाच पाटील गटाकडून विकास कामांची यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे. जेऊर, निंभोरे, वांगी 2, भाळवणी, कविटगाव, कोंढेज, कुंभेज, जातेगाव, घारगाव व रोपळे या गावांमधील काँक्रीटच्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. याशिवाय करमाळा मतदार संघातील गावांसाठी जनसुविधा योजनेअंतर्गत पाच कोटींच्या निधीची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

बजेट २०२३ : ‘सेक्स’वर कर, तुमच्या आत्म्यावरही कर ; या आहेत जगातील जुलमी कर पद्धती

राष्ट्रवादाच्या नावाखाली अदानीचे गोलमाल, पण फ्रॉडच्या सत्यापासून पळता येणार नाही; हिंडनबर्गचा जोरदार प्रहार

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात भाजप नेत्याने उपसले आंदोलनाचे हत्यार !

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

10 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

10 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

10 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

11 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

11 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

15 hours ago