राजकीय

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्या कानात काहीतरी पुटपुटले; विनायक राऊतांनी पेढा दिला

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचे उद्घाटन झाले. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समोरासमोर आलो. उद्धव ठाकरे माझ्या कानात काहीतरी पुटपुटले, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला (Narayan Rane and Thackeray came on the same platform).

चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राणे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी ठाकरे व शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची संधी राणे यांनी सोडली नाही.

उद्धव ठाकरे – नारायण राणे शेजारी शेजारी, चेहरे मात्र वेगवेगळ्या दिशेला !

एनसीबीची चित्रपट निर्माते इम्तियाज खत्रींच्या घरावर, कार्यालयावर छापेमारी!

विमानातून येताना खासदार विनायक राऊत माझ्याकडे पेढा घेऊन आले. राणे साहेब पेढा घ्या, असे मला म्हणाले. पेढ्याचा गुणधर्म गोड असतो. त्यामुळे बोलतानाही गोड बोला, याची आठवण मी त्यांना करून दिल्याचे राणे म्हणाले.

राणे यांनी यावेळी ठाकरे व शिवसेनेवर तोफ डागली. सी वर्ल्ड कोणी रद्द केले. तुम्ही आलात मला बरे वाटले. माझ्या वेळी धरणाची कामे झाली. पण आता का होत नाहीत. विमानतळ झाले, पण बाहेर पडल्यावर रस्त्यात खड्डे दिसतात, असे ते म्हणाले.

हा उद्घाटन सोहळा नक्की कोणाचा आहे. विनायक राऊत माईक घेतात. कार्यक्रम एमआयडीसीचा की आयआरबीचा ?. काही प्रोटोकॉल आहे की नाही ? अशाही सवालांच्या फैरी राणे यांनी झाडल्या.

भाजपचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत, फक्त ते कश्मीर खोऱ्यात नाहीत; शिवसेनेचा टोला

Fireworks expected as CM Uddhav Thackeray, Union Minister Rane to share dais in Sindhudurg today

बाळासाहेब ठाकरेंना कधी खोटे आवडत नव्हते. आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्री आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. सूक्ष्म उद्योग ८० टक्के माझ्या कार्यकक्षेत येतात. मी जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात आणणार. पुढच्या आठवड्यातच मी अधिकाऱ्यांना घेऊन येतोय. त्यासाठी एमआयडीसीचे सहकार्य हवं आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘आमचं भागवा अन् काम करा’ अशी भूमिका कोणी घेतली. पर्यटनाला येणाऱ्या लोकांनी रस्त्यातील खड्डे बघायचे का ? अशा शब्दांत राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

कीर्ती घाग

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

8 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

8 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

8 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

9 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

11 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

11 hours ago