32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे – नारायण राणे शेजारी शेजारी, चेहरे मात्र वेगवेगळ्या दिशेला !

उद्धव ठाकरे – नारायण राणे शेजारी शेजारी, चेहरे मात्र वेगवेगळ्या दिशेला !

टीम लय भारी

सिंधूदुर्ग : बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले (Chipi airport inauguration was held in the presence of the CM).

उद्धव ठाकरे व नारायण राणे हे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. दोघांमधून विस्तवही जात नाही. उद्घाटनाच्या अगोदर आठवडाभरापासून शिवसेना विरूद्ध राणे कुटुंबिय असे वादंग रंगलेले होते. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले

एनसीबीची चित्रपट निर्माते इम्तियाज खत्रींच्या घरावर, कार्यालयावर छापेमारी!

सोहळ्यासाठी ठाकरे – राणे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दोघांच्या खूर्च्याही एकमेकांच्या शेजारी होत्या. जवळपास तासभर दोघेही शेजारी बसले होते. पण दोघांनी एकमेकांचे चेहरे पाहणेही टाळले. शेजारी शेजारी बसलेले असतानाही त्यांचे चेहरे मात्र विरूद्ध दिशेला होते.

भ्रष्टाचाराने बुडलेल्यांनी आरोपाचे धाडस करू नये, राऊतांचा राणेंवर पलटवार !

Chipi airport inauguration: Union minister Narayan Rane and Uddhav Thackeray share stage for first time after ‘slapgate’ – Watch video

दोघांचीही अवस्था काहीशी अवघडलेली दिसत होती. पाहणाऱ्यांना मात्र हे चमत्कारीक वाटत होते. दोघांचे एकत्र व्यासपीठावर येणे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी मात्र मनोरंजन करणारे ठरले.

उद्धव ठाकरे – नारायण राणे शेजारी शेजारी, चेहरे मात्र वेगवेगळ्या दिशेला !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी