राजकीय

दिवाळीनंतरच्या धमाक्यासाठी “है तैयार हम”, फडणवीसांच्या इशाऱ्यावर नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई: दिवाळीमध्ये नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला, पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यार वसुलीचे आणि फडणवीसांच्या इशाऱ्यावर केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोप केला होता(Nawab Malik’s response to Devendra Phadnavis hint

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर राज्यातील ड्रग्जचा कारभार सुरु होता

)

 तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझे असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर हल्लाबोल करत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे.

नवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता : प्रवीण दरेकर

फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर राज्यातील ड्रग्जचा कारभार सुरु होता. फडणवीसांचा सचिन वाझे हा नीरज गुंडे आहे. नीरज गुंडे सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या, वसुलीचे काम पाहत होता असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.

यावेळी फडणवीसांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगत त्यांच्याविषयी पुरावा असल्याचा दावा केला आहे. दिवाळीनंतर मोठा धमाका करणार असल्याचा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी दिला भावी अधिकाऱ्यांना कानमंत्र

Will expose Nawab Malik’s ‘underworld links’ post Diwali: Devendra Fadnavi

फडणवीस नक्की काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावत असताना फडणवीसांनी मलिकांनाच इशारा दिला आहे. नवाब मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला आहे. मात्र मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे अंडर्वल्डशी संबंध आहेत त्यांनी माझ्याशी बोलू नये. माझ्याकडे नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे अनेक पुरावे आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना हे पुरावे देणार असून दिवाळीनंतर मोठा धमाका करणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

नवाब मलिकांचे आरोप काय?

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर त्यांचा सचिन वाझे म्हणजे नीरज गुंडे वसुली करत होते. नीरज गुंडे हे केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालांमधून फिरत आहेत. समीर वानखेडे यांना देखील वसुली करण्यासाठी बदली करुन आणले. फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडे नावाचा व्यक्ती हा राज्यातील पोलीस बदल्यांमधील वसुली, ड्रग्जचा व्यवसाय आणि सर्व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात त्याची उठ बस होती असा आरोप मलिकांनी केला आहे.

Mruga Vartak

Recent Posts

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

1 hour ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

2 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

3 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

3 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

4 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

4 hours ago