33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडे यांनी दिला भावी अधिकाऱ्यांना कानमंत्र

धनंजय मुंडे यांनी दिला भावी अधिकाऱ्यांना कानमंत्र

टीम लय भारी

पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या विकासाठी राज्याचा सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे. तसेच गुणवान विद्यार्थ्यांना सामाजिक विभागाच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळवून देणार. असे वक्तव्य राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने यूपीएसी व एमपीएसी परीक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले (Dhananjay Munde gave advice to future officers).

यावेळी मुंडे यांनी बार्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन युपीएससी व एमपीएसी परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश समाजातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. भविष्यात देशभरात अधिकारी म्हणून उच्च पदावर काम करताना आपण देशाच्या हितासाठी योगदान देऊ शकलो, तर आपल्या कामाचे नक्कीच चीज झाले समजा. असे मत मुंडे यांनी उपस्थित भावी अधिकाऱ्यांसमोर मांडले.

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

Dhananjay Munde : शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचा-यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश

Dhananjay Munde gave advice to future officers
शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात

शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असले तरी जागतिकीकरणाच्या युगात झालेल्या प्रचंड स्पर्धेत आपल्या देशाचे- राज्याचे विद्यार्थी कुठेही कमी नाहीत.  मात्र आर्थिक परिस्थितीमुळे कोणाची संधी हिरावून घेता जाता कामा नये हे देखील महत्वाचे असून  सर्व गुणवान विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच विभागाचे लक्ष असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्यासह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मिळवला सिंधुताई सपकाळांच्या संस्थेला अनुदान देण्याचा पहिला मान

Maharashtra Social Justice Minister and NCP leader Dhananjay Munde’s Facebook page hacked

पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने पुण्यात पालकमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा असलेले मुला-मुलींचे वसतिगृह त्याचबरोबर जागतिक स्तरावरील संशोधन केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुंडे यांनी दिली.

नासा मध्ये शिक्षण घेत असलेल्या तेजस्विनी शिंदे या विद्यार्थिनीचे उदाहरण देत निश्चितच असे विद्यार्थी पुढे देशाचे व राज्याचे नाव उज्वल करतील अशी आशा श्री. मुंडे यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी