33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयनवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता : प्रवीण दरेकर

नवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता : प्रवीण दरेकर

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे. असा आरोप मलिक यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे (Praveen Darekar criticizes Nawab Malik).

नवाब मलिक यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता आहे. ते दररोज सकाळ, दुपार व संध्याकाळ डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वक्तव्ये करत आहेत. त्याचबरोबर अत्यंत किळसवाणं राजकारण मलिक करत आहेत. असे म्हणत दरेकर यांनी मलिक यांच्यावर टीका केली आहे. दरेकर यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.

Pravin Darekar : मुख्यमंत्र्यांचा केवळ भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न : प्रविण दरेकर

Pravin Darekar : प्रविण दरेकरांची संजय राऊतांसह काँग्रेस-शिवसेनेवर सडकून टीका

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या गाण्याला एका ड्रग्ज पेडलरने फायनास केला असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

प्रविण दरेकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र

Bombay HC rejects plea by Pravin Darekar-led bank, clears way for state probe into alleged irregularities

अमृता फडणवीस यांच्या गाण्याला एक ड्रग्ज पेडलर जयदीप राणा कसा काय फायनान्स करू शकतो? असा प्रश्न मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. तसेच या गाण्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी